मुख्यमंत्री होऊन उद्धव ठाकरेंनी राज्यावर उपकाराचं केले-निलेश राणे

अजून काही उपकार आपण करणार असाल तर अगोदर कळवावे-निलेश राणे
FIR Against Nilesh Rane
FIR Against Nilesh Ranesakal
Updated on

मुंबई: गेल्या काही महिन्या पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजारपणामुळे मंत्रालयात उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र आगामी काही दिवसांत राज्याचे अधिवेशन आहे. या अधिवेशनात हजर राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात सांगितले. यावर भाजपच्या नेत्यांनी टीका- टीप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत यांच्यावर निशाणा साधला आहे. तर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत घणाघात केला आहे. ते म्हणतात ,किती उपकार म्हणावे तुमचे... इतके उपकार कुठल्या मार्केटमध्ये मिळतात जरा प्लीज कळवावे, जगाच्या पाठीवर एक मुख्यमंत्री इतके उपकार एखाद्या राज्यावर करणारा दुसरा नसेल. अजून काही उपकार आपण करणार असाल तर अगोदर कळवावे, लोकांना मानसिक दृष्ट्या पचवायला वेळ लागतो. असा टोला राणेंनी लगावला.

Summary

जगाच्या पाठीवर एक मुख्यमंत्री इतके उपकार एखाद्या राज्यावर करणारा दुसरा नसेल.

अतुल भातखळकर काय म्हणाले

अतुल भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रावर आपण जे उपकार करणार आहात त्या ऋणातून उतराई होण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगावा. महाराष्ट्र आपला आभारी आहे. तुम्ही आगामी अधिवेशनात हजर राहणार, त्यांनतर मंत्रालयातही जाणार आहात याबाबत आम्हाला कल्पना द्यावी असे भातळकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.