आज समीर वानखेडे यांनी मुंबई कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून साक्ष दिली आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे गेले काही दिवस एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे नावे चर्चेत आले आहे. या प्रकरणी समीर वानखेडेंबाबत बरीच माहिती पुढे येत आहे. यामुळे त्यांच्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोपही सुरु आहेत. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बाहेर जो प्रकार सुरू आहे. दरम्यान एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केलं आहे. मात्र असे असले तरी या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरले आहे. भाजपाचे निलेश राणे (Nilesh rane) यांनी ठाकरे सरकरावर ट्वीट करत निशाणा साधला आहे. (thackeray government)
ते म्हणतात, वर्षभरात ३० एसटी कर्मचारी यांनी कर्जबाजारीपणा आणि अपुऱ्या पगारामुळे आत्महत्या केली आहे. असे असंख्य महाराष्ट्रातले कष्टकरी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जीव सोडत आहेत. राज्यसरकार फक्त आर्यन खान व ड्रग्सच्या आजूबाजूला दिसत आहे. ठाकरे सरकार व ड्रग माफियाची पार्टनरशिप असल्यासारखं दिसतंय, असे गंभीर आरोप निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आज समीर वानखेडे यांनी मुंबई कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून साक्ष दिली आहे. वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली आहे. याशिवाय मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) यांनीही अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विटरवर एक जन्माचा दाखला शेअर केला असून हा दाखल समीर वानखेडेंचा असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तसेच 'समीर दाऊद वानखेडे, का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा' असा सवाल मलिकांनी वानखेडेंना विचारला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.