अर्थखातं बुद्धिमान व्यक्तीकडे असावं; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा असल्याचा टोलाही निलेश राणेंनी लगावला आहे
Nilesh Rane latest news
Nilesh Rane latest news
Updated on
Summary

अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा असल्याचा टोलाही निलेश राणेंनी लगावला आहे.

जीएसटीच्या परताव्याची पूर्ण रक्कम महाराष्ट्राला मिळालेली नाही, असा दावा महाविकास आघाडी सरकारने केला आहे. दुसरीकडे केंद्राने आम्ही जीएसटीच्या (GST) परताव्याचे सर्व पैसे चुकते केले, असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जीएसटीच्या परताव्याच्या रक्कमेवरून महाराष्ट्रात केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा एकदा तापला आहे. दरम्यान, यामध्ये भाजपाचे निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. अर्थमंत्री हे पद बुद्धिमान माणसाकडे असावं, असा टोला राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे. (Nilesh Rane latest news)

या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, अजित पवार म्हणतात GST चे ५० टक्के पैसे मिळाले अजून १५ हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांचे पण नवल वाटते, महाराष्ट्र ५ लाख कोटींचे मोठं व प्रगत राज्य आहे. पण GST च्या ३० ते ४० हजार कोटींवर चर्चा होते यावरून पवारांचे फायनान्स विषय कच्चा आहे, हे लक्षात येते. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं, असा टोला भाजपाचे निलेश राणे यांनी लगावला आहे.

Nilesh Rane latest news
'अहिल्यादेवींना फक्त लोकमाता किंवा पुण्यश्लोक म्हणा'

दरम्यान, आता निलेश राणे यांच्या या टीकेमुळे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून २१ राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांभाळताना हातभार लागावा, यासाठी ही भरपाई देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे.

Nilesh Rane latest news
राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस, 'या' भागांना सतर्कतेचा इशारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली होती. ३१ मे २०२२ पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.