Maharashtra Bhushan : विलासरावांनी दिलेला महाराष्ट्र भूषण निळू फुलेंनी नम्रतापूर्वक नाकारला होता आणि…

Nilu Phule refused Maharashtra Bhushan Award and asked Vilasrao Deshmukh to give it to abhay bang and rani bang
Nilu Phule refused Maharashtra Bhushan Award and asked Vilasrao Deshmukh to give it to abhay bang and rani bang
Updated on

निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतेच राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. समाज प्रबोधन, अध्यात्म, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने हा पुरस्कार जाहीर केला आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रा. हरी नरके यांनी लिहीलेली एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये प्रा. नरके यांनी ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले आणि तात्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक आठवण सांगितली आहे. यामध्ये कशा प्रकारे निळु फुले यांच्यामुळे २००३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना मिळाला होता.

Nilu Phule refused Maharashtra Bhushan Award and asked Vilasrao Deshmukh to give it to abhay bang and rani bang
Ajit Pawar Memes : निष्कारण दिवस फुकट गेला...; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मीम्सचा पाऊस

प्रा. हरी नरके लिहीतात की..

२००४ साल असावे. मी निळुभाऊंकडे बसलो अस्ताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा निळू फुले यांना फोन आला. ते म्हणाले, आमच्या शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे. तुमची संमती हवी.

निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे वट्ट मोजून पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही.

मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे असे सुनावले.

तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्च च्या माध्यमातून मोठे काम केलेले आहे, असे भाऊंनी सीएमना आग्रहपूर्वक सांगितले.

म्हणून २००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला.

Nilu Phule refused Maharashtra Bhushan Award and asked Vilasrao Deshmukh to give it to abhay bang and rani bang
Ahmednagar Politics : सुजय विखेंची जागा धोक्यात? खासदारकीसाठी राम शिंदे इच्छूक; केली मोठी घोषणा

यंदाचे महाराष्ट्र भूषण चे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी हे दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्राच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य करत आहेत . त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेला आहे. वडील नानासाहेब धर्माधिकारीही एक उत्तम प्रबोधनकार होते. विशेष म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे.

२००८ साली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला. पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वीकारला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.