‘टीसी’शिवाय मिळणार नववी, दहावीत प्रवेश; संस्थांना बसणार चाप

‘टीसी’शिवाय मिळणार नववी, दहावीत प्रवेश; संस्थांना बसणार चाप
Updated on
Summary

‘टीसी’ नसल्यास दुसरी संस्था अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही. या प्रकारांत संबंधित विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाते, शैक्षणिक नुकसान होते. सर्रास होत असलेला हा प्रकार शासनाच्या लक्षात आला आहे.

लातूर : आता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नववी, दहावीत एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय (टीसी) School Leaving Certificate मिळणार आहे. संबंधित संस्थेने टीसी दिलाच नाही तर वयानुसार प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या राज्यातील शैक्षणिक संस्थांना चाप बसणार आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी शुल्क भरू शकत नाहीत. यासह अन्य काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना शाळा सोडून दुसऱ्‍या शाळेत जावे लागते. त्यासाठी पहिली शाळा सोडताना ‘टीसी’ला महत्त्व आहे. अशा वेळी संस्थांकडून विद्यार्थ्यांची Student अडवणूक केली जाते. ‘टीसी’ नसल्यास दुसरी संस्था अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही. या प्रकारांत संबंधित विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाते, शैक्षणिक नुकसान होते. सर्रास होत असलेला हा प्रकार शासनाच्या लक्षात आला आहे. त्यातून शासनाने नवीन आदेश काढला आहे. यासाठी शासनाने ‘आरटीई’ RTE Actअधिनियमातील कलम ५ मधील (२) व (३)चा आधार घेतला आहे. विद्यार्थ्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा हक्क आहे. साधारण स्थितीमध्ये दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेतील शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्याला तत्काळ टीसी देणे गरजेचे आहे. काही कारणामुळे ते मिळविण्यास उशीर होत असेल किंवा हा दाखला नाकारला जात असेल तर दुसऱ्या शाळेत (शासकीय किंवा अनुदानित) प्रवेश Aided Or Non-Aided School Admission देण्यात उशीर करणे अथवा प्रवेश नाकारणे अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला एका शाळेतून दुसऱ्‍या शाळेत नववी व दहावीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा असेल तर तो 'टीसी’शिवाय द्यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.Ninth, Tenth Class Students To Be Get Admission Without TC

‘टीसी’शिवाय मिळणार नववी, दहावीत प्रवेश; संस्थांना बसणार चाप
पोलिस हेडकॉन्स्टेबलचा धक्कादायक शेवट, गळफास घेऊन आत्महत्या

विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश

राज्यातील कोणत्याही शासकीय, महापालिका, नगरपालिका किंवा खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत नववी, दहावीतील विद्यार्थी अन्य शाळेत प्रवेशाची मागणी करीत असेल तर अशा विद्यार्थ्यांना ‘टीसी’अभावी प्रवेश नाकारू नये, पूर्वीच्या शाळेकडून ‘टीसी’ प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप प्रवेश द्यावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरावा, दहावीपर्यंत तो प्रवेश कायम ठेवावा, असेही आदेशात म्हटले आहे.

..तर शाळा, मुख्याध्यापकावर कारवाई

एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नववी, दहावीच्या वर्गासाठी प्रवेश नाकारू नये. वयानुरूप प्रवेश द्यावा. प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडित होऊन तो शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळाप्रमुखांसह मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवल्यास संबंधित शाळा, मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()