N D Mahanor Death : निसर्गकवी ना धों महानोर काळाच्या पडद्याआड

Nisarg Kavi Na Dho Mahanor death news
Nisarg Kavi Na Dho Mahanor death newsesakal
Updated on

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोन्धाल्याला चांदणे लखडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि माझ्या पापणीला पूर यावे

(Nisarg Kavi Na Dho Mahanor death news)

पाहता ऋतुगंध कांती सांडलेली

पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे

मी असा आनंदुनी बेह्श होता

शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!

या त्यांच्या काव्या पंक्ती मधून माझे प्राण राणात गुंतले आहे असे सांगणारे शेतकरी हा त्यांच्या कवितेचा विषय असणारे निसर्ग कवी ना धों महानोर:

निसर्ग कवी म्हणून ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nisarg Kavi Na Dho Mahanor death news
Poet Surender Sharma: 'अरे मी जिवंत!' कवी सुरेंद्र शर्मांचा खुलासा

आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.त्यांचेवर पळसखेड ता सोयगावं येथील त्यांच्या राहत्या पान कळा येथे उद्या दी 4 रोजी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीतं लिहिली, तशा ठससेबाज लावण्याही लिहिल्या. श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही लावणी लोकप्रिय झाली. आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली आहे.

महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. त्यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे 'पानझड', 'तिची कहाणी', 'पळसखेडची गाणी' म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना.

Nisarg Kavi Na Dho Mahanor death news
Poet: बहिणाबाई चौधरी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा असणारी कवयित्री

केवळ निसर्गकविता न लिहिता, आपल्या काव्यलेखनाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यातून आपल्या गावी पळसखेड्याला शेतीचे विविध प्रयोगही केले. त्यामुळेच सरकार कुठलंही असो, त्यांचं लक्ष कृषिधोरणाकडे असायचं.

पंचेचाळीस वर्षांपूर्वी हजार लोकसंख्या असलेलं पळसखेडे ता सोयगाव तसेच जवळच असलेले वाकोद हे गाव महानोरांच्या कवितांमुळे जगाच्या नकाशावर आलं आहे. या गावाची माती आणि शेती त्यांना चिकटली ती कायमची. तिचा त्यांनी कायम अभिमान बाळगला. ते कुठेही गेले तरी पळसखेड हे त्यांचं आनंदनिधान ठरलं आहे.

तिथे त्यांनी महात्मा फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू केलं असून तेथील सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचं ते प्रमुख केंद्र ठरलं वाकोद चे भूमिपुत्र भवरलाल जैन यांच्याशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते म्हणून त्यांची आपले जन्मगावं पळसखेड व वाकोद विषयी नेहमीच आपुलकी होती

पत्नी सुलोचना महानोर यांच्या निधनाला दोन वर्ष देखील पूर्ण होत नाही तोपर्यंत कवी महानोर यांनी जगाचा निरोप घेतला

Nisarg Kavi Na Dho Mahanor death news
PM Gram Vikas Yojana : पंतप्रधान विकास योजनेतून आदिवासी गावांना 12 कोटी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()