NIT Land Scam : CM शिंदेंवर आरोप होतायत तो 'नागपूर न्यास घोटाळा' काय आहे?

nit land scam cm eknath shinde opposition demand resignation maharashtra assembly winter session 2022
nit land scam cm eknath shinde opposition demand resignation maharashtra assembly winter session 2022 esakal
Updated on

What is NIT Scam : नागपूर येथे हिवाळी अधिवेशानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नागपूर न्यास घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा नेमका घोटाळा काय आहे सविस्तर जाणून घेऊया .(CM Eknath Shinde News)

काही दिवसांपूर्वीच नागपूर न्यास जमीन वाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. तात्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता या याप्रकरणी विरोधीपक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

nit land scam cm eknath shinde opposition demand resignation maharashtra assembly winter session 2022
NIT Land Scam: भूखंड घोटाळ्यामुळं शिंदे सरकार गोत्यात! थेट CMच्या राजीनाम्याची मागणी

नेमकं प्रकरण काय आहे?

एप्रिल 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री म्हणून शिंदे यांनी 5 एकर सरकारी जमीन 16 बिल्डर्संना कमी दरात भाडेतत्वावर दिली होती. ही जमीन झोपडपट्टीवासीयांसाठी घरे बांधण्यासाठी होती. मात्र, ती काही खासगी विकासकांना देण्यात आल्याचे आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे.

या जमिनीची मालिकी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (NIT)कडे आहे. दरम्यान या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे की, बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत ही 83 कोटींहून अधिक होते. मात्र, ती 2 कोटींहून कमी किंमतीला 16 जणांना भाडेतत्वावर देण्यात आली.

nit land scam cm eknath shinde opposition demand resignation maharashtra assembly winter session 2022
Corona Outbreak : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! लोकांना बेड-औषधं मिळेनात; मृतदेह ठेवायलाही जागा नाही

याबाबत मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एनआयटीला खडे बोल सुनावले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही 4 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्यामुळे तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच हे संपूर्ण प्रकरण समोर आल्याने विरोधक यावरुन मुख्यमंत्री शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.