नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला; शिवसैनिकांनी फोडले फटाके

Nitesh Rane
Nitesh Ranee sakal
Updated on

कणकवली: शिवसेना नेते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (गुरुवार) सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळं त्यांची अटक होणार, असं दिसतंय. मात्र, गेल्या चार दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते अद्याप पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. मात्र, आता कोर्टाच्या या निर्णयानंतर त्यांची शोधाशोध सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, नितेश राणे यांचे वकील आता हायकोर्टात धाव घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. दुसरीकडे, शिवसैनिकांनी फटाके फोडले आहेत. त्यांना जामीन न मिळाल्याचा आनंदोत्सव शिवसैनिकांनी शाखेसमोर फटाके फोडून साजरा केला आहे

Nitesh Rane
नितेश राणेंना दिलासा नाहीच; सेशन कोर्टानं नाकारला अटकपूर्व जामीन

दुसरीकडे, जिल्ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडत आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक निवडणुकीतील (Sindhudurg District Central Co operative Bank Election) मतदान संपल्यानंतर शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी फटाके लावून आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कणकवली निवडणूक मतदान नंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना 'बाहेर जा' असे सांगितले मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांनी वेगवेगळे पथक तैनात केले. दंगा काबू पथक तसेच ब्लॅक कमांडो ही यावेळी उपस्थित ठेवण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजीही सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.