सिंधुदूर्ग: शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab)यांच्यावर झालेल्या हल्लातील केसमध्ये मला विनाकारण गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने पोलीस चौकशी करत आहेत. यावरून कुठे ना कुठेतरी मला गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय अस दिसत आहे. गेल्या दोन वर्षापासून विरोधी पक्ष नेत्यांवर चुकीची केस दाखवून महाविकास आघाडी सरकार अनेकाना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच अनुभव सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (Sindhdudurg Bank) अनुषंगाने मला आला आहे. अशी टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस कणकवली पोलिसांनी राणे यांची चौकशी केली आहे. यावरून राणे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. यातून त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघात ही केला आहे.
सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणुक प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदूर्ग ग्रामिण पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केली . मुख्य आरोपी सचिन सातपुते हा भाजप आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. सचिन सातपुते याला सिंधुदूर्ग ग्रामिण पोलिस आज कणकवली किंवा कुडाळ पोलिस स्टेशनला हजर करणार असल्याचीही माहीती मिळतेय.
दरम्यान राणे यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते म्हणतात, सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक सुरू आहे. सिद्धिविनायक सहकार पॅनल म्हणून भाजप प्रणित सर्व उमेदवार या पॅनलची निवडणूक लढवत आहेत. मतदारांमध्ये आमच्यावर असणाऱ्या विश्वासाच उत्साहाचं वातावरण दिसत आहे. यामुळेच आघाडी आमच्यावर आरोप करीत असून मला कुठे ना कुठेतरी मला गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप राणे यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण
जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतीश सावंत (Satish Sawant) यांचे निकटवर्ती असलेले करंजे (Karanje) गावचे माजी सरपंच शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर (ता.१८ ) रोजी सकाळी अज्ञात दोन जणांनी चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhdudurg Bank)निवडणुकीत परब यांचा थेट सहभाग असल्याने त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे बोलले जात होते. दरम्यान आज पोलीसांना आरोपींना पकडण्यात यश आले.
दरम्यान, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आज (ता.२६) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आहेत. त्यांनी नाव न घेता राणेंवर टिका केली आहे. ते म्हणाले, सहकारात पक्षीय राजकारण येवू देवू नका, तर चांगल्या लोकांच्या हातात जिल्हा बँक देवून मागच्या लोकांनी घालून दिलेला आदर्श कायम ठेवा. कोकणी माणूस हा विचार करुन मतदान करतो हा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती या निवडणूकीत करून चुकीच्या लोकांना बँकेपासून बाजूला ठेवा असेही आवाहन त्यांनी शरद कृषी भवन येथे आयोजित जिल्हा बँक निवडणूक पाश्वभूमीवर महाविकास आघाडी मेळाव्यात बोलताना केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.