सिंधुदुर्ग : गेले काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची आकडेवारी कमी होत आहे. यामुळे प्रशासनाने निर्बधांत शिथिलता आणायला सुरुवात केली आहे. मात्र काही ठराविक बाबतीत हे नियम अजूनही कायम आहेत. यामध्ये विकेंड लॉकडाऊन, (weekend lockdown) दुपारी चारनंतर लॉकडाऊन असे काही नियम आहेत. शिवाय प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियमांत शिथिलता आणलेली नाही. (covid -19) मात्र राज्यसरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली आहे. हिंदूंच्या सगळ्याच सणांना नियोजित पद्धतीने संपवण्याचे काम ठाकरे सरकारने केले असल्याचा घणाघात नितेश राणे (nitesh rane) यांनी केला आहे.
ते म्हणतात, सरकारने नियमावलीची तारीख बदलून मागील वर्षीची नियमावली आणली आहे. सगळ्याच हिंदूंच्या सणांना नियोजित पद्धतीने संपवण्याचे काम सुरु केले आहे. घरामध्ये असलेल्या मूर्तीची उंची कमी करा. गणपती विसर्जनासाठी (ganapati festival) महापालिका तुमच्या घरी येणार आणि त्या मूर्ती विसर्जन करणार असे अनेक नियम लागू केले आहेत. सरकारने होर्डिंग्ज लावण्यावरही निर्बंध आणेल आहेत, आता होर्डिंग्ज लावल्यावर कोरोना होतो का ? असा सवालही त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, या नियमांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी विशेषत: कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणात याबाबत कोणतीही नियमावली आहे का? हे समजणे गरजेचे आहे. यावर्षीही गणेशोत्सवासाठी गाड्या सोडणार की नाही? हेही जाहीर केले जातं नाही. 25 पेक्षा जास्त पत्र लिहूनही ठाकरे सरकारने यावर कोणतही उत्तरं दिलेलं नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी तेजस ठाकरे (tejas thackeray) यांच्या राजकारण प्रवेशच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ठाकरे घरातील कोणी राजकारणात येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. फक्त ज्या क्रिकेटरशी ज्याने तुलना केली आहे, त्यालाच विचारा दोन भावांमध्ये वाद घालण्याचा आहे का ? बाळासाहेबांचा आवाज असेल त्यांचा अशी अपेक्षा, कारण मोठ्या भावाने निराशा केलीय एवढं मात्र नक्की आहे, अशी खोचक प्रतिक्रीय त्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.