नितेश राणेंना अटक होणार? सिंधुदुर्ग ते मुंबईपर्यंत पोलिसांची फिल्डींग

Nitesh Rane in Santosh Parab Case
Nitesh Rane in Santosh Parab Casegoogle
Updated on

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना भोवणार असल्याचं दिसतंय. कारण, आमदार राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी सिंधुदुर्ग, गोवा विमानतळ आणि मुंबईमध्ये फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nitesh Rane in Santosh Parab Case
परब केस प्रकरणी मला अडकवण्याचे सरकारकडून प्रयत्न; नितेश राणे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. दरम्यान, भाजप आमदार नीतेश राणे यांची कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. सचिन सातपुतेची चौकशी केल्यानंतर शिवसेनेने भाजप आमदार नीतेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी लावून धरलीय. त्यामुळे कणकवली पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, नीतेश राणे चौकशीला आले नाहीत. त्यानंतर सिंधुदूर्ग पोलिस नीतेश राणे यांच्या घरीही गेले. मात्र, तिथेही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे नीतेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदूर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नीतेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथेही फिल्डींग लावल्याची माहीती मिळतेय. आज मुंबईत विधान भवनात भाजप आमदार नीतेश राणे उपस्थित राहीले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नीतेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाऊ शकतं, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नीतेश राणे यांनाही अटक होणार का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय.

अधिवेशन काळात अटक होणार का? -

अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. महत्वाच्या प्रकरणात अटक करायची असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. पण, अद्यापही विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन नितेश राणेंवर अटकेची कारवाई करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()