पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवलेल्या नोटीसेवरून भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज भाजपाकडून (BJP) राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. दाऊदला महाराष्ट्रभूषण द्या आणि गांधींऐवजी दाऊदचा फोटो लावा, अशी खरमरीत टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवलेल्या नोटीस प्रकरणी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आज राज्यातील नागपूर, सांगली, पुणे या ठिकाणी या नोटीसी जाळून त्याची होळी करण्यात आली आहे. यावेळी आक्रमक झालेले भाजपाचे (BJP) नितेश राणे म्हणाले, दाउदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका. सत्ताधारी आता सकाळी गूड मॉर्निंगचे मेसेज देतात तशा नोटिसा द्यायला लागल्या आहेत. आम्ही हिंदुत्वाची बाजू घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखु लागले आहे. देशाच्या विरोधात कारवाई करणारा दाऊदविरोधात (Dawood Ibrahim) आम्ही बोललो आहे. आमच्या वकिलांनी कायदेशीर उत्तर दिलं असल्यांच त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी नितेश राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून सरकार हादरले आहे. हिंदुत्वाची बाजू घेतली ते चुक असेल तर शंभर वेळा चुका करु, असेही त्यांनी ठणकावू सांगितले आहे. भाजप दंगली पसरवण्याचा कट करतयं यावर ते म्हणाले, यांसंबधित काय पुरावा आहे. शरद पवारांनी नवाब मलिक मुस्लिम हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी मी म्हणालो की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा तो हिंदु आहे म्हणून घेतला का, असा सवाल त्यांनी केला आहे. दाऊदला मदत करण्याचे सर्व पुरावे मलिकांच्या बाजून असूनही तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. हे दाऊदचं सरकार आहे का? महाआगाडीतील मंत्र्यांनी केबीनमध्ये महात्मा गांधींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावे. त्याला महाराष्ट्र भुषण देऊन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.