सेनेतील जुन्या नेत्यांचा मला खास मेसेज; राणेंचा आणखी एक गौप्यस्फोट

'आयकर विभागाच्या धाडीमुळे सेनेतील जुन्या फळीतील नेते आनंदित, म्हणाले..'
Political News
Political Newsesakal
Updated on
Summary

'आयकर विभागाच्या धाडीमुळे सेनेतील जुन्या फळीतील नेते आनंदित, म्हणाले..'

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरणात अनेक घटना वेगाने घडल्या आहेत. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Govt.) नेत्यांपाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागल्याने वातावरण आणखीन ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वीच प्राप्तीकर विभागाने (Income Tax) शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा (IT) टाकला आहे. दरम्यान, यावरून आता भाजपाच्या नितेश राणे यांनी ट्विट करत मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना टोला लगावला आहे. सेनेतील जुन्या फळीतील नेत्यांचे मला फोन येवून गेलेत असा गौफ्यस्फोट त्यांनी केला आहे.

Political News
पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींचं राऊतांना पत्र, म्हणाले...

ट्विटमध्ये आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, राहुल कनाल यांच्यावरील आयकर विभागाच्या धाडीमुळे सेनेतील जुन्या फळीतील नेते आनंदित आहेत. त्यांच्ये मला अनेक फोन येवून गेले आणि एक मेसेज पण दिला... लगे रहो, असे म्हणत त्यांनी शिवसेना टोला लगावला आहे.

कोण आहेत राहुल कनाल?

राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत. ते मातोश्रीच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. राहुल कनाल हे युवासेनेच्या कोअर कमिटीचा भाग आहेत. तसेच टीम आदित्यच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणून राहुल कनाल यांच्याकडे पाहिले जाते. राज्यपालनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषेदत वर्णी लागू शकणाऱ्या संभाव्य आमदारांमध्येही राहुल कनाल यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

Political News
पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा तडाखा, गारपीटीचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.