भाजपाचे निलेश राणे यासंबंधित ट्वीट करत ठाकरे सरकारवर टीका केली होती.
राजकीय वर्तुळात नेत्यांचे अनेक कारणांवरून आरोप्रत्यारोप सुरु असतात. यादरम्यान, मुंबईतील वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे, यामुळे राजकीय वातावरणात ढवळले आहे. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. भाजपाचे नितेश राणे यासंबंधित ट्वीट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का? असा सवाल राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. दरम्यान आता या मुद्द्यावरून नितेश राणे यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणीने जोर धरला आहे. लालबागमधील शिवसैनिकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. नितेश राणे यांनी 'बाळासाहेबांचं नाव बदलणार का ?' असं ट्विट केलं होतं. या ट्विट आणि नितेश राणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची नाहक बदनामी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून खोटी बातमी पसरवून दोन समाजात तेढ निर्माण केली आहे. त्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक अरविंद भोसले यांनी सांगितले आहे.
दरम्यान, लालबागनंतर वरळी पोलिस ठाण्यात शिवसैनिकांनी नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या नितेश राणेच्या ट्विटवरून शिवसैनिकांकडून संतप्त झाले आहेत. वरळी पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.