Nitin Desai : ''माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांचं नाव धुळीत मिळवू नका..'' नितीन देसाईंच्या मुलीची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

Nitin Chandrakant Desai Death Case
Nitin Chandrakant Desai Death CaseEsakal
Updated on

Nitin Chandrakant Desai Death Case : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेऊन त्याचा तपास सुरु केला होता. या प्रकरणात एक गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ECL finanace कंपनीच्या एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा झाला आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्यानं तगादा लावत मानसिक त्रास दिला, असे त्या तक्रारीत म्हटले गेले आहे. मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात कलम ३०६ आणि ३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलाय.

Nitin Chandrakant Desai Death Case
ATS Maharashtra:महाराष्ट्रात पकडलेले दहशतवादी ११ ऑगस्टपर्यंत एटीएसच्या कोठडीत, या प्रकरणाशी संबंधीत सहाव्या संशयिताला अटक

नितीन देसाई यांच्या कन्या मानसी देसाई यांनी 'एएनआय'ला प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी भावनिक आवाहन करत, माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांनी खूप कष्टातून स्टुडिओ उभा केला होता, त्यांचं नाव मातीत मिसळू नका... असं आवाहन केलंय.

काय म्हणाल्या मानसी देसाई?

माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला. कर्ज फेडण्यासंदर्भात दोन वर्षे कंपनीबरोबर मीटिंग करुन खूप प्रयत्न केले. लोन सेटलमेंट किंवा रीस्ट्रक्चर करण्यासंदर्भात कंपनीने आश्वासनं दिली होती. आपण सगळं हँडल करु, असं सांगितलं जात होतं. परंतु त्यांनी दुसऱ्या बाजूला लीगल प्रोसिडिंग सुरु केली. इन्व्हेस्टर बाबांची मदत करायला तयार होते, मात्र त्यांनी त्यांना मदत करु दिली नाही.

Nitin Chandrakant Desai Death Case
Nitin Chandrakant Desai Funeral : बॉलीवूडचा 'विश्वकर्मा' अनंतात विलीन! नितीन देसाई यांना अखेरचा निरोप

त्यामुळे खोट्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. खूप मेहनत करुन बाबांनी नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका. असं म्हणत मानसी यांनी कंपनीवर ठपका ठेवला आहे.

काल सायंकाळी अंत्यसंस्कार

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. एनडी स्टुडिओमध्येच हा विधी पार पडला आहे. यावेळी रायगड पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. देसाई यांचा मुलगा कांत याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार आमीर खान, दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता मुकेश ऋषी, भाजपचे नेते विनोद तावडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सुबोध भावे, मानसी नाईक, आदेश बांदेकर आदींसह देसाई यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार, चाहते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.