एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिलेले आमदार नितीन देशमुख यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली असून मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसमधून देण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना १७ जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेनेत झालेल्या बंडाच्या वेळी नितीन देशमुख हे शिंदे गटातील आमदारांसोबत गेलेले पण गुवाहाटीला न जाता सूरतहूनच परत आले होते. देशमुखांवर बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. एसीबीच्या अमरावती येथील कार्यालयात तक्रार नोंदवण्यात आली होती. १७ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान या एसीबीने पाठवलेल्या नोटीसीवर बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, बेनामी संपत्ती म्हणल्यावर मला हसू आलं. माझी बेनामी संपत्ती आहे कुठं? सरकार बदललं तेव्हा पासून अशा नोटीसा येत आहेत.
देशमुख म्हणाले की, पहिली नोटीस आली तेव्हा भावनाताईंनी आम्ही अश्लिल चाळे केले म्हणून गुन्हा दाखल करत पहिली नोटीस आली. दुसरी नोटीस नागपूर येथे ३५३ दाखल केला आता तिसरी एसीबीची नोटीस.. या गोष्टी होणार आहेत हे अपेक्षितच होतं . मी ईडीच्या नोटीसीची वाट पाहत होतो असे देशमुख म्हणाले.
हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
माझे कारखाने, कंपन्या कुठे आहेत ते एसीबीने दाखवून द्याव्यात मी त्या माझ्या आहेत का ते सांगतो. त्यामाझ्या असतील तर कारवाई करावी. मी १७ तारखेला चौकशीला हजर राहाणार असेही नितीन देशमुख म्हणाले. तसेच त्यांनी ही याचा काही फरक पडणार नाही. ही नोटीस का आली ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण ज्यांनी तक्रार दिली त्यांनी माझे कारखाने मला जागेवर नेऊन एसीबीने दाखवावेत असे अवाहन नितीन देशमुख यांने केलं.
यापुर्वी देखील ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीसा मिळाल्या आहेत. त्यामध्ये आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी आणि आता नितीन देशमुख यांचा देखील समावेश झाला आहे. आता या चौकशीतून काय समोर येईल हो पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.