Shivsena Video : 'गुवाहाटी'ऐवजी अयोध्येत होणार होतं बंड; आदित्य ठाकरेंसोबत गेलेल्या आमदारांना तिथेच...

Eknath Shinde Aaditya Thackeray
Eknath Shinde Aaditya ThackeraySakal
Updated on

मुंबईः शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आज एक व्हीडिओ पॉडकास्ट जारी करण्यात आला. त्यामध्ये आमदार नितीन देशमुख यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहेत.

आमदार नितीन देशमुख यांना एकनाथ शिंदे यांनी बंडामध्ये सोबत नेलं होतं. परंतु नंतर त्यांनी सर्व नाकारुन मूळ शिवसेनेत येणं पसंद केलं. आज शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी 'आवाज कुणाचा' या कार्यक्रमांतर्गत नितीन देशमुख यांच्याशी संवाद साधला.

Eknath Shinde Aaditya Thackeray
Pune Crime : वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत, खासदार सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

नितीन देशमुख यांनी बंड कसं झालं, कुणाला कुठून कसं नेलं आणि पुढे काय काय घडामोडी घडल्या याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी २० जून रोजी शिवसेनेमध्ये बंड झालं होतं. पक्षातून ४० आणि इतर १० असे ५० आमदार फोडून शिंदेंनी राज्यात सत्तास्थापन केली.

मागच्या वर्षी झालेल्या बंडाचा अनुभव सांगतांना नितीन देशमुख म्हणाले की, खरं बंड हे आधीच होणार होतं. तेही अयोध्येत. सर्व तयारी झाली होती. माझं तिकीटही काढलं होतं. परंतु ऐनवेळी सगळं रद्द झालं.

Eknath Shinde Aaditya Thackeray
Shivsena Video : बंडाच्या दिवशी शिंदे समोरच्या सीटवर बसून कुणाशी फोनवर बोलत होते?, देशमुखांचा थरारक अनुभव

काय म्हणाले नितीन देशमुख?

15 जून २०२२ रोजी आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा झाला होता. तेव्हा सर्व आमदारांना अयोध्येला बोलावून तिथेच थांबवून ठेवण्याचा प्लॅन होता. देशमुख म्हणाले की, सुरतचं बंड होण्याअगोदर उत्तर प्रदेशमध्ये आदित्य ठाकरे रामाच्या दर्शनाला गेले होते. या लोकांचं प्लॅनिंग असं होतं की, आमदार तिथेच बोलवायचे आणि तिथेच ठेवायचे.

आमदार देशमुख पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार असल्याने तिथे बंड यशस्वी करण्याचा प्लॅन होता. एका आमदाराने माझं तिकिटही काढलं होतं. परंतु नंतर दौरा रद्द झाल्याचा निरोप आला.

दरम्यान, १५ जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येत रामाच्या दर्शनाला गेले होते. २० जून रोजी एकनाथ शिंदेंनी राज्यात बंड केलं आणि आमदार सुरतला हलवले. अयोध्येत आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि संजय राऊतदेखील होते. परंतु तेथील प्लॅन का रद्द झाला, हे स्पष्ट झालेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.