गडकरी म्हणाले, दहा वर्षांत शेतकरी पेट्रोल, डिझेलचा पर्याय देईल

महापालिकेला इथेनॉलवरील स्कॅनिया कंपनीच्या बस दिल्या. परंतु, महापालिकेने त्यांना इथेनॉलचेही पैसे दिले नाही.
Nitin Gadkari
Nitin GadkariNitin Gadkari
Updated on

नागपूर : महापालिकेला इथेनॉलवरील स्कॅनिया कंपनीच्या बस दिल्या. परंतु, महापालिकेने त्यांना इथेनॉलचेही पैसे दिले नाही. पैस न दिल्याने ही कंपनी बस घेऊन निघून गेले. महापालिकेने तिकिटवरही इथेनॉलवरील बस चालवली. परंतु, तिकिटाचेही पैसे कंपनीला दिले नाही. अखेर कंपनी कंटाळून बस घेऊन निघून गेली. कंपनीने महापालिकेवर दावाही केला. ऑर्बिट्रेटर नेमून हा वाद आता निकाली निघाला, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे वनामती सभागृहात शनिवारी (ता. १२) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येणारा काळ हा इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन व इलेक्ट्रिकवरील इंधनाचा आहे. पुढील दोन वर्षांत प्रत्येकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना दिसून येईल. १६ मार्चला ग्रीन हायड्रोजनवरील वाहनाचे लोकार्पण करणार आहे, असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

Nitin Gadkari
योगींच्या सरकारमध्ये चार उपमुख्यमंत्री! २० मार्चनंतर नवीन सरकार?

महापालिका, नगरपालिकांना शौचालयाच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून इलेक्ट्रोलायजरचा वापर करीत ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पाण्यातून हायड्रोजन काढून त्यावर वाहने चालविण्यात येईल. हे भविष्यातील इंधन आहे. पुढील दहा वर्षांत शेतकरी पेट्रोल, डिझेलचा पर्याय देईल, असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

दुचाकी, कार इथेनॅालवर चालणार

काही लोक एक रुपयाचे काम करतात आणि दहा रुपयाचे सांगतात. आमची सवय १० रुपयाचे काम करणे आणि एक रुपयाचे सांगणे. म्हणून मी हे माध्यमांपर्यंत पोहोचू शकलो नाही. राजकारणी माणसावर विश्वास कमी असतो. परंतु, मी या खात्याचा मंत्री आहे. म्हणून इथेनॅाल बाबत बोलतो त्यावर विश्वास ठेवा. सहा महिन्यांत फ्लेक्स इंजिन येणार आणि दुचाकी, कार इथेनॅालवर (Ethanol) चालणार, असेही नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
रविवारी सीडब्ल्यूसीची बैठक; गांधी कुटुंब देणार राजीनामा?

विदर्भ म्हणजे १०० पैकी २० पेक्षा कमी गुण घेणाऱ्यांची शाळा

मागच्या जन्मात ज्यांनी पाप केले ते एकतर वर्तमान पत्र सुरू करतात नाही तर साखर कारखाने काढतात. मी विदर्भात (Vidarbha) साखर कारखाने सुरू केले. साखर कारखान्याच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरीटवाल्या विद्यार्थ्याची शाळा, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये आलेल्यांची शाळा. तसेच विदर्भ म्हणजे १०० पैकी २० पेक्षा कमी गुण घेणाऱ्यांची शाळा. शंभर टक्के मुलांची शाळा, असेही नितीन गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.