छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यादरम्यान कोश्यारींच्या विधानानंतर भाजपचे नेते नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर विधानानंतर गडकरींच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये गडकरी म्हणाले आहेत की, आई वडिलांपेक्षा आमची शिवरायांवर निष्ठा असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. गडकरी म्हणाले की, "शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, आमच्या आई वडिलांपेक्षादेखील छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे."
हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, "यशवंत किर्तीवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. डिएड-बिएड कॉलेजमध्ये मिळणारा राजा नव्हता, वेळ पडलीतर आपल्या मुलाला देखील कठोर शिक्षा देणारा राजा होता," असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
तुमचे आवडते हिरो- आदर्श कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासाठी बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं विधान केलं होतं.
या विधानावरून नवा वाद निर्माण झाला. यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गटाने या विधानाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यादरम्यान आता गडकरींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.