Nitin Gadkari: "गडकरींना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केले तर..." विधानसभेसाठी RSSचा नवा प्लॅन काय? व्हिडिओ रिपोर्ट

Nitin Gadkari Vidhan Sabha Election: लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election, RSS And Nitin Gadkari
Maharashtra Vidhan Sabha Election, RSS And Nitin GadkariEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष देशभरात काठावर पास झाला. ज्या राज्यांमध्ये भाजपला धक्का बसला त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालातून सावरत असताना भाजपने थोड्याच दिवसांत होणाऱ्या विधानसभेसाठी भाजपने सावध पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राज्यात पुन्हा भाजपची सत्ता यावी यासाठी पक्षाला मदत करण्याचे ठरवले आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रीय पातळीवरचा एखादा आश्वासक चेहरा महाराष्ट्र विधानसभेसाठी द्यावा असा सल्ला भाजप नेतृत्त्वाला दिला आहे. यासाठी संघाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गळ घातल्याची चर्चा आहे. (Nitin Gadkari)

नितीन गडकरी यांनी गेल्या 10 वर्षांत केंद्रिय मंत्री म्हणून केलेल्या कामामुळे लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. यासह राज्यात त्यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते. त्यामुळे गडकरींनी राज्यात सक्रिय व्हावे असे संघाला वाटते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एखाद्या अनुभवी नेत्याला राज्यात आणावे का याबाबत संघ आणि भाजप चाचपणी करत आहे. असे असले तरी याबाबत भाजपकडून अंतिम निर्णय झालेला नाही. जर गडकरी राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले तर महाविकास आघाडीलाही त्यांची रणनीती बदलावी लागेल हे नक्की आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election, RSS And Nitin Gadkari
Gujarat Rain : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरूच; विविध दुर्घटनांत नऊ जणांचा मृत्यू

याबाबत साम टीव्हीशी बोलताना राजकीय विश्लेषक मृणालिनी नानीवडेकर म्हणाल्या की, सकाळ वृत्त समूहाने नुकतीच जी पाहणी केली होती, त्यात असे दिसून आले की, "जर नितीन गडकरी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केले तर 40 टक्के मते बदलू शकतात. आज माध्यमांमध्ये जी चर्चा सुरू आहे हे त्याचेच प्रातिनिधीक स्वरूप आहे की गडकरींनी राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे. त्यामुळे गडकरींसारखा वेगळ्या उंचीचा आणि झेप असलेला नेता महाराष्ट्रात आला तर निकाल बदलू शकतील."

Maharashtra Vidhan Sabha Election, RSS And Nitin Gadkari
Mumbai Traffic News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑगस्टपर्यंत वाहतुकीत मोठे बदल, असे असणार पर्यायी मार्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()