Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; ''कॅगच्या रिपोर्टनंतर...''

nitin gadkari
nitin gadkari esakal
Updated on

मुंबईः येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यापूर्वीच इंडिया आघाडीतील एका पक्षाच्या नेत्याने थेट गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. कॅगच्या अहवालामध्ये गडकरींच्या खात्यावर ठपका ठेवण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झालेल्या आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गडकरींना संपवण्याचा दिल्लीतून कट रचला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनीच गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देऊ केलीय.

nitin gadkari
Luna 25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!

काय म्हणाले विनायक राऊत?

नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून दिल्लीमधल्या नतद्रष्ट लोकांनी त्यांना संपवण्याचा कट रचला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेल. गडकरी यांना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी दिल्लीकरांना दाखवून द्यावं.

राऊत पुढे म्हणाले की, नितीन गडकरींनी इंडिया आघाडीमध्ये यावं. आम्ही त्यांना पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाहीत. असा शब्द उद्धव ठाकरेसुद्धा देतीत. फक्त गडकरींनी दिल्लीकरांना घाबरु नये.

nitin gadkari
UP Crime: शेजाऱ्याच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या रागातून मुस्लिम मुलाच्या आई-वडिलांची हत्या

कॅगच्या रिपोर्टवर गडकरी काय म्हणाले होते?

रिपोर्टमध्ये सांगितलेले मुद्दे योग्य नाहीत. द्वारका एस्क्प्रेसवे २९ किलोमीटर अंतराचा असल्याचं सांगण्यात आलंय. आम्ही जी कॅबिनेट नोट पाठवली होती त्यात लिहिलं होतं की, आम्ही पाच हजार किलोमीटरचा टू लेन रोड बनवू आणि त्याची किंमत ९१ हजार कोटी रुपये असेल. यात फ्लायओव्हर आणि रिंगरोडची किंमत इस्टिमेटेड डीपीआर बनल्यानंतर ठरवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

मुद्दा असा आहे की कॅग ज्याला २९ किलोमीटर म्हणत आहे, तो २३० किलोमीटरचा एस्क्प्रेसवे आहे. यात ६ टनेल आणि ५६३ किमी एकूण लेनचा रोड आहे. जो टेंडर निघाला होता तो २०६ कोटी रुपये प्रति किलोमीटर साठी होता. त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टवर १२ टक्के कमी खर्च केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.