नाशिक : निवृत्ती महाराज इंदुरीकर (nivrutti maharaj indurikar) आपल्या वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे वादाचा फेरा काही संपत नाही. नाशिकमध्ये किर्तन करत असताना निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. काय म्हणाले इंदुरीकर महाराज...
इंदुरीकर महाराजांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्रासह देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. मात्र कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगवेगळी
यापूर्वी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. कोरोना आणि लसीविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते उपस्थितांना म्हणतात, “कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं हे टेन्शनने गेली. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे”, असं ते म्हणाले.
इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, दिग्गज डॉक्टर, लसीकरणासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाजमाध्यमांवरुन तर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.