Supriya Sule : राष्ट्रवादीचे कोणतेही कार्यकर्ते भांडलेले नाही, मी शिवसेनेला...; सुप्रिया सुळेंचं विधान

mp Supriya Sule
mp Supriya Sulesakal
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला गदारोळ थांबायचं नाव घेत नाही. अजित पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली. तर शरद पवार यांनी देखील अजित पवार माझे पुतणे असून मी त्यांना भेटणं काही वावगं नाही. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे.

mp Supriya Sule
Narayan Rane : शरद पवार कृषीमंत्री होणार का? नारायण राणे म्हणाले...

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरणांमध्ये कोणीही गल्लत करू नये. त्याचवेळी नातीगोती जपत असताना खाली कार्यकर्ते एकमेकांशी भांडत आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे एकमेकांबरोबर भांडण झालं नाही. गैरसमज नको. तसेच मी शिवसेना आणि काँग्रेसशी बोलले आहे. त्याची कुणी चिंता करायची गरज नाही.

mp Supriya Sule
Ajit Pawar: 'मी त्या गाडीत नव्हतोच', शरद पवारांसोबतच्या 'त्या' भेटीत काय घडलं? अजित पवारांनी सांगितलं स्पष्टच

दरम्यान पवार साहेबांची सांगोल्याची सभा आणि प्रेस पाहिल्यावर कोणताही संभ्रम निर्माण होण्याची गरज नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.