खबरदार..! आता शिव्या द्याल तर, राज्यातील सहा विद्यापीठांत...

Latest YAwatmal News: या अभियानाची दखल घेत राज्यातील तब्बल सहा विद्यापीठांनी ‘शिव्या बंदी’चे परिपत्रक जारी केले आहे.
no bed words allowed in 6 universities in maharashtra
no bed words allowed in 6 universities in maharashtra sakal
Updated on

अविनाश साबापुरे

सकाळ वृत्तसेवा

latest Vidarbha News: रागाच्या भरामध्ये अथवा भांडणादरम्यान परस्परांना आई-बहिणीवरून शिव्याची लाखोली वाहिली जाते. अनेकदा किरकोळ शिवी देखील एखाद्या मोठ्या गुन्ह्याला जन्म देऊ शकते. स्थलकालपरत्वे शिव्यांचे स्वरूप बदलत जाते पण त्यांचा विषारीपणा कायम राहतो.

शिव्यांमुळे स्त्रियांचा अवमान तर होतोच पण त्यामुळे विखारही वाढतो. आता हाच शिव्यांचा प्रसार रोखण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ मंडळी सरसावली आहेत. त्यासाठी ‘शिव्यामुक्त समाज अभियान’ सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, या अभियानाची दखल घेत राज्यातील तब्बल सहा विद्यापीठांनी ‘शिव्या बंदी’चे परिपत्रक जारी केले आहे.

no bed words allowed in 6 universities in maharashtra
Yawatmal Crime: कळंबमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक; पोलिसांची मोठी कारवाई!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.