ST: एसटीच्या भोंगळ कारभारामुळे कऱ्हाडकरांचे हाल !

Railway: कऱ्हाड रेल्वेस्टेशनची एसटीबस येईना ट्रॅकवर, खासगी वाहनांचाच घ्यावा लागतोय आधार
ST:  एसटीच्या भोंगळ कारभारामुळे कऱ्हाडकरांचे हाल !
Updated on

Karhad Railway Station: कऱ्हाड रेल्वेस्टेशनवरुन दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात. त्यासाठी त्यांना येथील एसटी स्टॅण्डवरुन ओगलेवाडीतील रेल्वे स्टेशनला जावे लागते. मात्र एसटी आगारातुन रेल्वेच्या वेळेत एसटीबस सुटल्या जात नाहीत.

त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरून कऱ्हाड बसस्थानकात येण्यासाठी वेळेत बस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एखाद-दुसरी एसटीबस सोडली जाते. त्यात रेल्वेतुन येणारे प्रवाशी अनेक आणि एसटीतुन जाणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अशी स्थिती होत आहे.

ST:  एसटीच्या भोंगळ कारभारामुळे कऱ्हाडकरांचे हाल !
Karhad News: पोलिसांची मोठी कारवाई, कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्‍सरवर फिरवला बुलडोझर

त्यासंदर्भात रेल्वेच्या प्रवाशांनी मागणी करुनही कार्यवाही शुन्यच होत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसुन रिक्षा व अन्य वडापच्या वाहनांनी रेल्वेस्टेशन गाठावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होवुन त्यांना वरुन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कऱ्हाडचे रेल्वे स्टेशन पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वेस्टेशनवरुन कोल्हापूर, सांगलीसह कोकणातील प्रवाशांची ये-जा सुरु असते. हे स्टेशन शहरापासुन चार-पाच किलोमीटर दूर ओगलेवाडीजवळ आहे. त्या स्टेशनवर जाण्यासाठी एसटी महामंडळाने पुर्वी स्वतंत्र एसटी बसची सोय केली होती.

ST:  एसटीच्या भोंगळ कारभारामुळे कऱ्हाडकरांचे हाल !
ST: एसटी महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय ॲपव्दारे, प्रक्रिया होणार पारदर्शक

त्या एसटी बसच्या फेऱ्या रेल्वेच्या वेळेप्रमाणे नियोजीत करण्यात आल्या होत्या. त्यातही रेल्वेने येणारे प्रवाशी शेकड्यात आणि एसटी बसमध्ये सुमारे पन्नासच प्रवाशी जावु शकतात. त्यातच पुन्हा लगेच दुसरी एसटीबस उपलब्ध नसते. त्यामुळे उर्वरीत प्रवाशांना खासगी गाड्यांनी जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही. त्याकडे एसटीबसचे दुर्लक्षच झाल्याचे चित्र आहे.

कऱ्हाडमधून धावतात दररोज सुमारे १५ रेल्वे

महालक्ष्मी एक्सप्रेस, चालुक्य एक्सप्रेस, हुबळी दादर एक्सप्रेस, हजरत निजामुद्दी गोवा एक्सप्रेस, दर्शन एक्सप्रेस, बेंगलुर-गांधीधाम एक्सप्रेस, बेंगळुर-जोधपुर एक्सप्रेस, बेंगळुर आजमेर एक्सप्रेस, कोल्हापुर-निजामुद्दीन एक्सप्रेस, सुवर्णजयंती एक्सप्रेस, सातारा ते कोल्हापुर, कोल्हापुर ते सातारा, पुणे ते कोल्हापुर, कोल्हापुर ते पुणे पॅसेंजर रेल्वेसह अन्य रेल्वे धावतात. त्यासाठी दररोज सुमारे चारशे ते पाचशे प्रवाशी येथुन प्रवास करतात.

ST:  एसटीच्या भोंगळ कारभारामुळे कऱ्हाडकरांचे हाल !
Jalgaon Crime: नागेश्वर कॉलनीत चोरट्यांच्या ‘चड्डी गँग’ची दहशत! उघड्या अंगाने आले, कॅमेरे फिरवले, चोरीचा प्रयत्न अयशस्वी

प्रवासासाठी जवानांची संख्या मोठी

कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या रेल्वेस्टेशनवरुन भारतीय सैन्यदलातील जवानांची मोठी वर्दळ असते. या स्टेशनवरुन त्यांना सांगली, कोल्हापुर, सातारा, सोलापुर, चिपळुण, रत्नागिरी या आपल्या भागातील घरी जाण्यासाठी आणि तेथुन नेमणुकीच्या ठिकाणी जाण्यासाठी कऱ्हाड हे मध्यवर्ती ठिकाण पडते. त्यामुळे त्यांची सातत्याने या रेल्वेस्टेशनवरुन ये-जा सुरु असते. मात्र त्यांना रेल्वेस्टेशन पर्यंत जाण्यासाठी वेळेत एसटीबस उपलब्ध होत नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे.

कऱ्हाड रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी वेळेत एसटीबस उपलब्ध होत नाहीत. मी अनेकदा त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे नाईलाजाने खासगी प्रवाशी वाहतुकीच्या वाहनांतुन जावे लागत आहे. एसटी व्यवस्थापकांनी त्याची दखल घेवुन तातडीने एसटी बस सुरु कराव्यात.

नानासाहेब बाबर, प्रवाशी

ST:  एसटीच्या भोंगळ कारभारामुळे कऱ्हाडकरांचे हाल !
Jalgaon Crime: मानसिक त्रासाला कंटाळून मुलानं उचललं टोकाचं पाऊल! संशयितांना पोलिस कोठडी! घुमावल बुद्रूक येथील घटनेतील तिघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.