No Confidence Motion: मतदान एक, व्हीप दोन; संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप, कायदेशीर लढाईचे संकेत?

ajit pawar and sharad pawar
ajit pawar and sharad pawar
Updated on

No Confidence Motion: लोकसभेत अविश्वासावर मतदान करण्यासाठी राष्ट्रवादीने  दोन व्हीप काढले आहेत. एकीकडे सुनिल तटकरे यांनी व्हीप काढला तर शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हीप काढला आहे. राष्ट्रवादीचे खासदार मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संसदेच्या अधिवेशनात अविश्वास  प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. या प्रस्तावाच्या मतदानासाठी दोन व्हीप काढले आहेत. त्यामुळे मोठा राजकीय गोंधळ होणार आहे.

अविश्वास प्रस्तावावर जेव्हा लोकसभेत चर्चा होते. तेव्हा मतदान देखील होत असते. या मतदानात राष्ट्रवादी भूमिका ठरणार आहे. लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. यापैकी ४ महाराष्ट्रातील आहेत. तर एक खासदार लक्षद्वीपचे आहेत.

सुप्रिया सुळे, मोहम्मद फैझल, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे आहेत तर सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे कुठल्या व्हीपला लोकसभा अध्यक्ष अधिकृत मान्यता देतात. यावर पुढच्या कारवाईचे भवितव्य अवलंबून आहे.

ajit pawar and sharad pawar
Eden Garden Stadium : आधी वेळापत्रकाचा गोंधळ आता स्टेडियमलाच लागली आग... बीसीसीआयच्या अडचणीत वाढ

व्हीपचे उल्लंघन पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. दोनी गटांनी एकमेकांच्या विरोधात व्हीप काढल्यामुळे लढाई तिव्र होण्याची शक्यता आहे. मतदानावेळी परिस्थिती स्पष्ट होईल. (latest marathi news)

शिवसेनेच्या प्रकरणार व्हीपचा मुद्दा कळीचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे राष्ट्रवादीतील आगामी कायदेशीर लढाईचे हे संकेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार गटाला अद्याप वेगळा पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे तटकरे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ajit pawar and sharad pawar
Pune Accident : पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर 10 वाहनांचा भीषण अपघात; 1 मृत्यू, 5 गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.