राज्यातील शाळा कधी सुरु होतील? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

'शाळा सुरू करण्यासंदर्भातही लवकरच निर्णय घेतला जाईल.'
Rajesh Tope
Rajesh Tope Sakal file photo
Updated on

जालना : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास आज वर्ष झाले आहे. लसीकरण ऐच्छिक आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आयसीयू आणि व्‍हेन्टीलेटरची गरज पडत नाही. त्यामुळे प्रत्येकांने लस घेतली पाहिजे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रविवारी (ता.१६ ) जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान शाळा सुरू करण्यासंदर्भातही लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले आहे. यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, सध्या कोरोना (Corona) संसर्ग रोखण्यासाठी लावलेले निर्बंधांचे तंतोतंत पालन करण्याचे मोठे आव्‍हान आहे. कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील भिती संपली आहे. मात्र, सर्वांनी कोरोनाबाबत सजग राहणे (Jalna) गरजेचे आहे. कारण कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. (No Need To Corona Vaccinated Peoples, Said Rajesh Tope)

Rajesh Tope
गप्प बसणारे भाजप नेते चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात - रोहित पवार

आजघडीला रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी आहे. परंतु हिच परिस्‍थिती कायम राहिली तर त्‍याचा परिणामी मृत्यूदरावर मागील वर्षाच्‍या लाटेप्रमाणे रुग्णसंख्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढु नये यासाठी लागू केलेले निर्बंध हे सर्वांसाठी समान आहेत. त्यात राजकीय, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी यांनीही हे निर्बंध पाळणे गरजेचे आहे. गर्दी होऊ नये याची प्रत्‍येकानी दक्षता घेतली पाहिजे. शिवाय कोरोना लसीकरण सुरू होऊन आज वर्ष झाले आहे. मात्र, लसीकरण बंधनकारक नसून ऐच्छीक आहे. सध्या ९० टक्के लसीकरण झाले असून हे लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी आरोग्य विभाग मिशन मोडवर काम करत आहे.

Rajesh Tope
औरंगाबादेत थरार ! जुन्या वादातून तरुणाचा नऊ जणांनी केला खून

तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये ही चर्चा झाली आहे. लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण अत्‍यल्‍प आहे. मात्र, शाळा सुरू करण्यासंदर्भात दोन मतप्रवाह असून यासंदर्भात पंधरा दिवसानंतर चर्चेअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ही श्री. टोपे यांनी यावेळी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.