कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही; पटोलेंकडून राणेंच्या वक्तव्याचा निषेध

nana patole
nana patolenana patole
Updated on

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. पण आजचं राणेंना सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं सुत्रांकडून कळतं. त्यासाठी त्यांना जवळच्या महाड येथील कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, आज घडलेल्या राणे प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मत मांडलंय. मुख्यमंत्र्याचं शासकीय निवसस्थान वर्षा बंगल्यावर अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नाना पटोले यांच्यासोबत बैठक झाली.

nana patole
स्मृती इराणींचं राणे प्रकरणावर भाष्य; म्हणाल्या...

त्यानंतर नाना पटोले यांनी म्हटलंय की, आम्ही दिवसभर नांदेडला कार्यक्रमात असताना ही घटना कळली. राज्यात ज्या घटना कधी घडल्या नाहीत, त्या भाजपच्या माध्यमातून घडतात. जे महाराष्ट्राच्या संस्कृतीत देखील नाही. याप्रकारचं वक्तव्य निषेधार्ह आहे. काँग्रेसने निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भाजपाने असं वर्तन का करावं, हे कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्री १३ कोटी जनतेचं प्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे. कायद्यापेक्षा कुणी मोठा नसतो. सोशल मीडियावरही कुणी असं काही टाकलं तर कारवाई होते. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य थेट बोलावं, ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये भुषणावह नाही. राजकीय सूडबुद्धीतून हे घडतंय त्यांनी ते जे बोलले त्याचं समर्थन करत आहेत का? हे तपासावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.