मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; शिंदेंचे पोलिसांना आदेश

विशेष प्रोटोकॉलमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो
Chief Minister Eknath Shinde will take charge today
Chief Minister Eknath Shinde will take charge today esakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. ताफ्यासाठी लागू केलेल्या विशेष प्रोटोकॉलमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो असं म्हणत त्यांनी पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. (No special Protocol For CM convoy)

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल असतो. यावेळी रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक थांबवली जाते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा कुठेही गेला तरी स्पेशल प्रोटोकॉल लागू केला जातो पण वाहतुकीचा खेळखंडोबा नको म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी पत्रव्यवहार करत प्रोटोकॉल काढून टाकण्यासंदर्भात चर्चा केली आहे.

Chief Minister Eknath Shinde will take charge today
भाजपसोबत युती करणार नाही, येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : राजू शेट्टी

सरकारची मुख्यमंत्र्यांसाठी असलेली प्रोटोकॉल प्रक्रिया सामान्य जनतेला त्रासदायक ठरणार नाही यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. पण यासंदर्भात पोलिस विभागाशी चर्चा करावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पोलिस विभागाशी चर्चा करून त्यांना विशेष प्रोटोकॉल काढून टाकण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सामान्यांना यावेळी होणारा त्रास कमी झाला असून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

Chief Minister Eknath Shinde will take charge today
उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर; भारत अबेंप्रती व्यक्त करणार आदरभाव

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच कामाचा आणि बैठकांना सुरूवात केली होती. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काल त्यांनी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल फ्री ची घोषणा केली आहे. तसेच काल त्यांनी सांगली कोल्हापूरच्या पूराचे पाणी मराठवाड्यात वळवणार अससल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला असलेला विशेष प्रोटोकॉल काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.