लता दीदींच्या निधनाची बातमी ऐकली आणि नि:शब्द झालो : पंडित उद्धव आपेगावकर

मी दररोज एक तास तानपुरा छेडते. यावरच मी स्वरांचा रियाज करते, असे म्हणाल्या. दीदींचे हे वाक्य कला, शास्त्रीय संगीत, सुगम न नाट्य कलावंताना आजही मार्गदर्शक आहे.
Lata Mangeshkar News
Lata Mangeshkar Newsesakal
Updated on

अंबाजोगाई (जि.बीड) : लता दीदींच्या निधनाची बातमी ऐकली आणि नि:शब्द झालो. २८ वर्षांपूर्वी त्यांच्या घरी निमंत्रण देण्यास गेल्याचा प्रसंग आठवला, अशा शब्दांत जगप्रसिद्ध पखवाद वादक पंडित उद्धव आपेगावकर (Pandit Uddhav Apegaonkar) यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. कै. शंकरबापू आपेगावकर, माईर्सचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड यांच्यासोबत मी व राहुल कराड होतो. त्यावेळी (१९९६) आळंदीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) होते. याचे अध्यक्ष शांता शेळके (Shanta Shelke) होते. त्याचेच हे निमंत्रण घेऊन आम्ही लता दीदींच्या मुंबई स्थित घरी गेलो होतो. आम्ही त्यांची प्रतिक्षा करित असताना काही क्षणात त्या मुख्य दालनात पोचल्या. आल्याबरोबर त्यांनी शंकर बापूंचे दर्शन घेतले. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व असताना त्या बापूंना वंदन करतात हे पाहुन आम्ही आवाक् झालो. (No Words When Heard Demise News Of Lata Mangeshkara, Said Pandit Uddhav Apegaonkar)

Lata Mangeshkar News
लता दीदींनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले अन् देवीसमोर गायले कवन

यावेळी त्यांनी बापूंचा व विश्वनाथ कराड यांचा सत्कार केला. बापूंना शाल व मंगेशाची मुर्ती त्यांनी भेट दिली. निघताना बापूंनी त्यांच्या तानपुऱ्याला नमस्कार केला असता त्या बापूंना म्हणाल्या, बापू मी दररोज एक तास तानपुरा छेडते. यावरच मी स्वरांचा रियाज करते, असे म्हणाल्या. दीदींचे (Lata Mangeshkar) हे वाक्य कला, शास्त्रीय संगीत, सुगम न नाट्य कलावंताना आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी दिलेली २८ वर्षांपूर्वीची ती शाल आज बाहेर काढुन तिला मी नतमस्तक झालो. (Beed)

Lata Mangeshkar News
Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जीवन प्रवास

दिलेल्या निमंत्रणा प्रमाणे, त्या साहित्य संमेलनास उपस्थित राहिल्या. त्यात त्यांनी पसायदान सादर केले होते. ते अद्याप आठवणीत आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो, असे पंडित आपेगावकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.