Devendra Fadanvis: "एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस आहेत सुपर मुख्यमंत्री? काँग्रेसने उदाहरण देऊन केलं स्पष्ट

अजित पवारांचा स्वभाव संपुर्ण महाराष्ट्राला आणि शासनकर्त्यांना माहिती आहे म्हणत पटोलेंची टीका
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी भाजप नेत्याच्या कारखान्यांवर लादलेली बंधने हटवली आहेत. भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असून हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यावर बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंनी टोला लगावला आहे.

आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली त्यावेळी बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना लक्ष केलं आहे. यावेळी बोलताना नाना पटोलें म्हणाले की, अजित पवारांचा स्वभाव संपुर्ण महाराष्ट्राला आणि शासनकर्त्यांना माहिती आहे. अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे दादागिरी काय असते. ती महाविकास आघाडीमध्ये काय आहे ते पाहिलेले आहे.

Devendra Fadanvis
Supreme Court: सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला; नागरिकांना सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना

'शिंदे गट जेव्हा वेगळा झाला, त्या शिंदे गटाचा आरोप अजित पवार यांच्यावर होता. आता अजित पवार त्याच सरकारमध्ये स्वत: अर्थमंत्री झालेत. त्यामध्ये वेगळं काही नाही. पण, मलाई कोणाला जास्त मिळते तो विषय आहे. साखर कारखाने मलाईचा विषय आहे. मलाईच्या वाटणीत काही गडबडी झाल्यात', असंही पुढे पटोले म्हणालेत.

Devendra Fadanvis
Sharad Pawar: पुन्हा एकदा शरद पवार गट अ‍ॅक्शन मोडमध्ये! आता 'या' राज्यावर लक्ष करणार केंद्रित

'त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमी आणि सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे कालच्या निर्णयाने स्पष्ट झाले' असल्याचंही पटोले म्हणाले आहेत. एखादा चेहरा समोर ठेवायचा आणि भाजपचा सत्तेचा उपभोग घेण्याचा निर्णय स्पष्ट झाला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न समोर असताना सरकार खुर्चीसाठी लागली आहे असा टोला देखील पटोलेंनी लगावला आहे.

'तर गेल्या वर्षभरापासून अनेक जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत. राज्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. हे परवा मंत्रालयाच्या परिसरात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे दिसून आले आहे. सरकार फक्त खुर्चीच्या लढाईत व्यस्त आहे', असंही पटोले यावेळी बोलताना म्हणालेत.

Devendra Fadanvis
Rohit Pawar: भाजपासोबत जाण्याच्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली? रोहित पवार म्हणाले 'माझी भूमिका इतकी..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.