मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र, राजकीय उलथापालथ सुरूच आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) वगळता शिवसेनेच्या (Shiv Sena) ५३ आमदारांना (MLA) नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. `खंजीर खुपसणाऱ्यांचे माझ्यावर इतकं प्रेम का?’ असा प्रश्न नोटीस न पाठवल्याने आदित्य ठाकरे यांनी केला. (53 shiv sena mla notice from shivsena excluding aaditya thackeray)
एकनाथ शिंदे गटातील ३९ आणि ठाकरे कॅम्पमधील १४ आमदारांना (MLA) नोटिसा मिळाल्या आहेत. सोमवारी सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणीच्या वेळी व्हिपचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे. या ५३ आमदारांना आठवडाभरात उत्तर मागितले आहे.
राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
४ जुलै रोजी एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या आमदारांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप जारी केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे (Shiv Sena) प्रतोद सुनील प्रभू यांनीही शिवसेनेच्या सर्व आमदारांना सरकारच्या बाजूने मतदान न करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर एक आमदार शिंदे गटात सहभागी झाला. तसेच १५ जणांनी विरोधात मतदान केले.
त्याच दिवशी भरत गोगावले यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली होती. प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करणाऱ्या १४ आमदारांवर अपात्रतेसह शिस्तभंगाची कारवाई करावी. ठरावाच्या विरोधात मतदान न करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावे, अशी याचिकाही प्रभू यांनी दाखल केली होती. त्यांनी ३९ जणांची नावे दिली होती.
म्हणणे सभापतींसमोर मांडण्याचे निर्देश
विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ जुलै रोजी ३९ बंडखोर आमदारांनी सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेच्या १५ आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. त्या दिवशीही भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या १४ आमदारांविरोधात सभापतींकडे याचिका दाखल केली होती. भागवत यांनी जारी केलेल्या नोटीसनुसार, ५३ आमदारांना सात दिवसांच्या आत कागदपत्रांसह त्यांचे म्हणणे सभापतींसमोर मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. तसेच सुनील प्रभू यांची पक्षाचे मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती केली. यानंतर शिंदे सभापतींकडे गेले आणि त्यांची पुन्हा शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच भरत गोगावले यांची मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रतिस्पर्धी गटांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.