Ajit Pawar : लबाड लांडगा प्रकरण गोपीचंद पडळकरांना भोवणार; सात दिवसांचा अल्टिमेटम, नाहीतर...

Ajit Pawar : लबाड लांडगा प्रकरण गोपीचंद पडळकरांना भोवणार; सात दिवसांचा अल्टिमेटम, नाहीतर...
Updated on

सोमेश्वरनगर: अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करून अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ॲड.असीम सरोदे व अन्य कायदेतज्ञामार्फत सदर नोटीस बजावत सात दिवसात लेखी माफी मागण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय.

Ajit Pawar : लबाड लांडगा प्रकरण गोपीचंद पडळकरांना भोवणार; सात दिवसांचा अल्टिमेटम, नाहीतर...
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट! महिन्याला 200 किलो ड्रग्ज अन्...

''अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आणि सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक'' अशी वादग्रस्त व अवमानकारक विधाने पडळकर यांनी 23 सप्टेंबरला केली होती. यावरून बारामतीसह पुणे जिल्ह्यात संताप व्यक्त होत होता.

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात लढलेले नितीन यादव यांनी या अस्वस्थतेला वाट करून देत ॲड. सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. अवंती जायले यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Ajit Pawar : लबाड लांडगा प्रकरण गोपीचंद पडळकरांना भोवणार; सात दिवसांचा अल्टिमेटम, नाहीतर...
CM Eknath Shinde:MH-04 गाड्यांना टोलमाफी मिळणार? ठाकरे-शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, निर्णय लवकरच सांगणार

अजित पवार हे पाच वेळा उपमुख्यमंत्री तर सुळे या संसदरत्न खासदार आहेत. मताधिक्याने विजयी होणारे लोकप्रतिनिधी आहेत. याउलट पडळकर यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन खोटी माहिती निवडणूक आयोगास दिली आहे.

दंडेली पोलिस ठाण्यात दाखल असलेला फसवणुकीचा गुन्हा व अन्य गुन्हे लपवले. एका वाहिनीवर पडळकरांनी गुन्हे कबूलही केले. असे असताना पवार कुटुंबियांबाबत बदनामीकारक, बेताल, अश्लाघ्य वक्तव्य केले. ते सोशल मीडियात व्हायरल झाल्याने सायबर गुन्हा घडला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजातील वातावरण दुषित व्हावे म्हणून जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

यादव म्हणाले, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सात दिवसात पवारसाहेब, अजितदादा व सुप्रियाताई यांची स्वतंत्रपणे लेखी माफी न मागितल्यास त्यांना न्यायालयात खेचून दिवाणी,फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.