Sanjay Raut: "आता फक्त एकच राहिलंय, भाजपकडून श्रीरामालाच उमेदवारी दिली जाईल"; संजय राऊतांचा खोचक टोला

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सध्या देशभरात वातावरण निर्मिती सुरु आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut
Updated on

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सध्या देशभरात वातावरण निर्मिती सुरु आहे. त्याचबरोबर यावरुन सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांकडूनही राजकारण केलं जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

आता भाजप श्रीरामालाच निवडणुकीसाठी उमेदवारी देईल, असं त्यांनी त्यांनी म्हटलं आहे. (Now only thing left is that BJP will announce Lord Ram will be their candidate for elections says Sanjay Raut)

राम मंदिराच्या राजकारणावर भाष्य

अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरील चर्चेवर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "रामाच्या नावानं इतकं राजकारण सुरु आहे की, आता फक्त एकच गोष्टी शिल्लक राहिली आहे ती म्हणजे भाजप २२ जानेवारीला निवडणुकीत आपला उमेदवार म्हणून श्रीरामाच्या नावाचीच घोषणा करेल" (Latest Marathi News)

Sanjay Raut
Sanjog Waghere: अजितदादांचा विश्वासूच देणार पार्थ पवारांना आव्हान! ठाकरे गटाकडून लोकसभा लढवण्याची तयारी?

ठाकरे-पवारांना निमंत्रण नाही

दरम्यान, उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण देण्यात आलेलं नाही. हा भाजपच्या राजकारणाचा भाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)

तसेच बाबरी मशीद पाडली तेव्हा त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती तर भाजपवाल्यांनी हातवर केले होते, असा आरोपही संजय राऊत सातत्यानं भाजपवर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()