Tehasildar Post: राज्य सरकारचा पुन्हा झटका! आता तहसीलदार पदंही कंत्राटी पद्धतीनं भरणार

राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
Eknath shinde
Eknath shinde Esakal
Updated on

मुंबई : राज्य शासनानं सरकारी पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यापूर्वी सरळसेवा भरती कंत्राटी पद्धतीनं भरण्याची जाहीरात सरकारनं काढली होती. आता तहसीलदार पदासाठीही कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळं राज्य सरकारनं होतकरु तरुणांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. (Now Tehsildar posts will also be filled on contract basis Jalgaon Collector Office published advertisement)

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं तहसीलदार पदाची जाहिरात काढली असून ही भरती कंत्राटीपद्धतीनं होणार आहे. या जाहिरातीनुसार, नायब तहसीलदार, कारकून पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) प्रशासनात येण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तहसीलदारपदासारखी जागा जर कंत्राटी पद्धतीनx भरली जाणार असेल तर आम्ही काय करायचं? असा सवाल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.