Nrendra Modi Nashik Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील श्री काळाराम मंदिरात स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. यावेळी तो मंदिराच्या आवारात साफसफाई केली. दिसला. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या एका कार्यक्रमात याचा उल्लेख केला आणि देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन देशवासियांना केले. दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केले. या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले. मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते. अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते. तरीही आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती मॉप घेऊन सफाई दर्शन केलेच! याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाई वर खर्च केलेले 10 ते 12 लाख रुपये वाया गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे. पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी भेटायला पाहिजे होत. नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय.पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत?, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे राऊत म्हणाले. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.