Maratha Reservation: सरकारला माझ्या भावाला सिरियस करायचंय, पण.. ; जरांगेंच्या भेटीला आलेल्या आरोग्यसेविकेला रडू कोसळलं

माझ्या भावाचा जीव वाचवा; मनोज जरांगेची प्रकृती पाहून भेटीला आलेल्या भगिनीला अश्रू अनावर
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

मराठा आरक्षणासाठी राज्यात जोरदार आंदोलन सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनोज जरांगे यांना पाठिंबा मिळत आहे. राज्याच्या अनेक भागात आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणचा आजचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. भेटीसाठी आलेल्या आरोग्यसेविकांनी जरांगे पाटील यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं आहे. पण हे सांगत असतानाच त्या आरोग्यसेविकेला आपले अश्रू अनावर झाले. जरांगे यांची परिस्थीती पाहून त्यांना रडू कोसळलं. रडत रडत त्यांनी मनोज जरांगे यांना उपचारांची गरज असल्याचं सांगितलं आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : अजित पवारांचे दोन शिलेदार देणार राजीनामा? मराठा आरक्षण आंदोलन पेटलं

नांदेडहून आलेल्या रेखा पाटील यांना मनोज जरांगे यांची खालावलेली प्रकृती पाहून अश्रूंचा बांध फुटला. सरकार मनोज जरांगे यांचा जीवच घ्यायचा आहे, असा संतप्त सवाल रेखा पाटील यांनी केला आहे.

तर सरकारने गेल्या ४० दिवस काय केलं. सरकारला जरांगे भाऊंचा जीवच घ्यायचा आहे. ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यावेळी त्यांनी काहीच नाही केलं. साधी एक बैठकही नाही घेतली. यांना पुरावे हवे होते, त्यांना पुरावे देखील दिले आहेत. आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? असा सवालही रेखा पाटील यांनी सरकारला केला आहे.

Maratha Reservation
Mla Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांचं नवं वेळापत्रक मान्य होणार? आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार

'मनोज जरांगे यांची एक एक पेशी मरायला लागली आहे. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांचा बीपी खूप लो झाला आहे. त्यांचा तातडीने सलाईन लावणे गरजेचं आहे. अन्यथा माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. तुम्ही सगळं बंद करा आणि माझ्या भावाचा जीव वाचवण्याचं बघा, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. आपण बघ्याची भूमिका घेणे अत्यंत मुर्खपणा ठरु शकतो. आपण त्यांचा जीव घ्यायचा का? त्यानंतर आरक्षण घेऊन करायचं काय? माझा भाऊ आरक्षण पाहायला जिवंत राहिला पाहिजे. तो तडफडून मरत आहेत, हे बघत राहायचं का? असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maratha Reservation
Kiran Mane on Manoj Jarange: "संविधान गुंडाळू पहाणाऱ्या या व्यवस्थेला..."; मराठा आरक्षणासंदर्भात किरण मानेंची रोखठोक पोस्ट चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.