Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर; थेट मुख्यमंत्र्यांना फोन

''सगेसोयऱ्यांबद्दल बोलताना गिरीश महाजरांनी ते टिकणार नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे. असं असेल तर नोटिफिकेशन काढता कशाला, राज्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न का करता? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.''
vijay wadettiwar
vijay wadettiwaresakal
Updated on

Laxman Hake : ओबीसींच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचले आहेत. यावेळी वडेट्टीवार भावुक झाल्याचं बघायला मिळालं.

उपोषणस्थळी येताच विजय वडेट्टीवार हे भावनिक झाले. एवढंच नाही तर वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले होते. मागच्या आठ दिवसांपासून जालन्यातल्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरु आहे.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवर म्हणाले की, सत्ता, पदं येत असतात जात असतात. मी मंत्री असतानाही समाजासाठीच काम करत होतो आणि इथून पुढेही समाजासाठीच काम करणार आहे.

vijay wadettiwar
Sujay Vikhe: अहमदनगरमधील निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली, सुजय विखेंनी 'ते' 18 लाख कशासाठी भरले

''हे राज्य फुले-शाहू-आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आजची जी परिस्थिती चिघळली आहे, ती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चिघळली आहे. आमच्या हक्काच्या आरक्षणाला नख लावण्याचं काम सरकार करत आहे.'' असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

''मी आत्ताचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोललो असून सरकारचं शिष्टमंडळ उद्या येथे येणार आहे. त्यामुळे सरकारने या आंदोलनाकडे गांभिर्याने बघावं, अशी आमची मागणी आहे.''

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सगेसोयऱ्यांबद्दल बोलताना गिरीश महाजनांनी ते टिकणार नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे. असं असेल तर नोटिफिकेशन काढता कशाला, राज्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न का करता? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

vijay wadettiwar
Kranti Redkar: दुसऱ्या जातीत लग्न केल्यावर आयुष्यात काय बदल झाला? क्रांती रेडकर म्हणाली, 'पहिल्याच दिवशी...

''आज समाजातील समता बिघडवण्याचं काम कुणामुळे चाललं आहे, याचा विचार केला पाहिजे. लक्ष्मण हाके हे निःपक्ष नेतृत्व आहे. त्यांनी या अगोदर राज्य मागासवर्ग आयोगात काम केलेलं आहे. ओबीसी समाज त्यांच्यासोबत असून समाजाला त्यांच्या नेतृत्वामध्ये न्याय मिळेल.'' असं वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळावरुन मुख्यमंत्र्यांना फोन फिरवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय उद्या (शनिवार) राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पाठवत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.