Chhagan Bhujbal: OBC महासंघाच्या अध्यक्षांची भुजबळांपेक्षा वेगळी भूमिका; भुजबळ म्हणाले, 'त्यांचं समर्थन नसेल तर..'

Chhagan Bhujbal: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर आता कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalEsakal
Updated on

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर आता कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत आहे. याला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यांनी यासाठी बैठका घेण्यास सुरवात केली घेतली.

मात्र, मंत्री छगन भुजबळ यांच्या भुमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी समर्थन नाही. सध्या सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिेकेवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal
NCP MLA Disqualification: 'राष्ट्रवादी'च्या आमदारांचा फैसला लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत नार्वेकरांना द्यावा लागणार निर्णय

त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, त्यांचं समर्थन नसेल तर नसेल. आमच्यामध्ये वेगवेगळ्या जातींचे ३७४ वाटेकरी होते, ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता हजार वाटेकरी झाले आहेत. आता ३७४ वाटेकऱ्यांचे हक्क आता कमी होणार हे साधं गणित आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांच्या बैठकींना वेग आला आहे. याबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले दिवसभर चर्चा, कामे, सभा यांची कामे सुरू असतील. ओबीसी यात्रा काढण्यात येणार आहे, त्याचा मार्ग ठरवण्यात येईल.

Chhagan Bhujbal
'मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा', रेल्वे भरतीची जाहिरात शेअर करत राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

ओबीसीच्या असलेल्या ५४ टक्यांमध्ये आणखी २० ते २५ टक्के तुम्ही घुसवले आणि तेही बंलदंड तर कसं होणार. आता ३७४ जाती जमातींचे आरक्षण बलदंड लोक घेऊन जाणार, आता आम्हाला आमचं आरक्षण संपल्यात जमा आहे असं आम्हाला वाटतं आहे, म्हणून आम्ही सातत्याने बोलतो आहे. देशातील, राज्यातील करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत, असंही पुढे भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal
Rahul Narwekar: राहुल नार्वेकर यांना दिल्लीत मोठी जबाबदारी; ओम प्रकाश बिर्ला यांनी केली घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.