Sharad Pawar : ''मुख्यमंत्र्यांकडे जावून शरद पवार पोहे खाऊन आले का?'' ओबीसी नेत्याचा आरोप, भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Kunbi Certificate : ''धनगरांच्या एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असं शरद पवार सांगतात. पण आमच्या चार पिढ्या या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यावेळी त्यांची काहीच भूमिका नव्हती. त्यामुळे त्यांनी आमच्यामध्ये भांडण लावू नये.''
cm shinde sharad pawar meeting
cm shinde sharad pawar meetingesakal
Updated on

OBC Maratha Reservation : राज्यामध्ये आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद सुरु आहे. त्यातच शरद पवारांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अधिकृतरित्या कुठलीही माहिती पुढे आलेली नसल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांवर टीकास्र सोडलं आहे.

बीडमध्ये बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवार ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावत आहेत. आमच्या एसटीच्या आरक्षणासाठी चार पिढ्या खपल्या आणि आता शरद पवार म्हणत आहेत आमचा पाठिंबा आहे.

cm shinde sharad pawar meeting
Vidhan Sabha Election: क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या आमदाराला पुन्हा लढायचयं! 'या' पक्षाकडे मागितली उमेदवारी

पुढे बोलतांना लक्ष्मण हाके म्हणाले की, दोन समाजामध्ये भांडणं लागलेली असताना शरद पवार शांत बसलेले आहेत. त्यांनी पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या तोंडी नेहमी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव असते. मात्र जरांगे ज्यावेळी एकीकडे म्हणतात धनगर आणि आम्ही भाऊ-भाऊ आहोत, तीच वेळ साधून बारामतीमध्ये शरद पवार पिवळा रुमाल घालून धनगर समाजाच्या कार्यक्रमात जावून बसतात.

''धनगरांच्या एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असं शरद पवार सांगतात. पण आमच्या चार पिढ्या या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यावेळी त्यांची काहीच भूमिका नव्हती. त्यामुळे त्यांनी आमच्यामध्ये भांडण लावू नये.'' असं आवाहन हाकेंनी केलं.

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत बोलताना हाके म्हणाले की, जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये भूमिका निभावली आहे. त्यावरून त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे, हे कोणाचे पिल्लू आहे, हे छोट्या बाळाला सुद्धा माहित आहे. असं असताना शरद पवार मूग गिळून का गप्प आहेत?

''शरदचंद्र पवार मुख्यमंत्र्याकडे मीटिंगला जावून फक्त पोहे खाऊन आले का? गावगाडा विस्कळीत होत असताना पवार बोलत का नाहीत? हे न कळलेलं कोड आहे.'' असंही हाके म्हणाले.

cm shinde sharad pawar meeting
Budget 2024: निर्मला सितारमन यांचा सुद्धा गुलाबी पॅटर्न ! अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पांढरी साडी

मुख्यमंत्री-पवारांच्या भेटीत काय झालं?

शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी या मुद्यावर राजकारण न करता तोडगा काढावा, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याचे समजते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या बैठकीत शरद पवार यांनी राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या उपोषणकर्त्यांना कोणती आश्वासने दिली आहेत? याची माहिती घेतली. तसेच सरकार हा तिढा सोडविण्यासाठी कोणती पावले टाकत आहे? हे देखील त्यांनी जाणून घेतले. या विषयावर राज्य सरकारने मराठा-ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन सहमतीने निर्णय घ्यावा. सरकार या दोन्ही समाजाच्या हिताचा जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा राहील अशी हमी पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com