OBC Melava : ''मी भुजबळांसोबत युती करायला तयार'', महादेव जानकरांनी स्पष्ट केली भूमिका

OBC Melava : ''मी भुजबळांसोबत युती करायला तयार'', महादेव जानकरांनी स्पष्ट केली भूमिका
Updated on

हिंगोलीः हिंगोलीतल्या रामलिला मैदानावर ओबीसी समाजाची दुसरी सभा सुरु आहे. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, महादेव जानकर यांच्यासह राज्यातील विविध समाजाच्या नेत्यांची उपस्थिती आहे.

यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, ओबीसींनी ठरवलं पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेत जायचं नाही. व्हायचं तर आमदार आणि खासदारच व्हायचं. ओबीसींनी ठरवलं तर यांना झेंडा धरायलासुद्धा माणसं मिळणार नाहीत. ओबीसींनी जागरुन होऊन आपल्या हक्कासाठी जागरुन राहिलं पाहिजे.

OBC Melava : ''मी भुजबळांसोबत युती करायला तयार'', महादेव जानकरांनी स्पष्ट केली भूमिका
Neelam Gorhe: महिला सुरक्षेसाठी पोलीस दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मगणी

ओबीसी समाजाने डिमांडर होण्यापेक्षा कमांडर झालं पाहिजे. मिळमिळीत भूमिका घेऊन आता चालणार नाही. या ओबीसी लढ्यामध्ये दलित आणि मुस्लिम यांनासुद्धा सोबत घेतलं पाहिजे. सर्वांनी मिळून राजकारणात उतरलं पाहिजे आणि ताकद दाखवून दिली पाहिजे, असंही जानकर म्हणाले.

''भुजबळ साहेब, आम्ही तुमच्याबरोबर युती करायला तयार आहोत. परंतु त्यांच्याबरोबर जाणार नाही. वंजारी, धनगर, माळी या समाजातून आपण पैसा उभा करु शकतो. तुम्ही आमचे माईलस्टोन नेते आहात. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ एकत्र आले असते तर क्रांती झाली असती'' असं महादेव जानकर म्हणाले.

OBC Melava : ''मी भुजबळांसोबत युती करायला तयार'', महादेव जानकरांनी स्पष्ट केली भूमिका
माझ्या नादी लागू नका.. म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना भुजबळांनी काय दिलं उत्तर? जाणून घ्या

दरम्यान, उपस्थित सर्वच नेत्यांनी मराठा समाजावर टीका करत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला. टीपी मुंडे यांनी मराठा समाजाने जमिनी कुठे घालवल्या? असा प्रश्न उपस्थित करत लावणीचा संदर्भ जोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()