ओबीसी मंत्री खूप आहेत पण बोलणारे फार कमी आहेत - छगन भुजबळ

. "जे घाबरलेत त्यांनी ताबडतोब भाजपमध्ये (bjp) जायचं. मग सारं काही माफ होत"
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

जळगाव: जळगावमध्ये ओबीसी हक्क परिषद (obc right council) सुरु आहे. त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) बोलत आहे. "इथे सगळे जोरजोरात बोललेत, जरा संभाळून राहा. उद्या इन्कम टॅक्स घरी येईल. जे घाबरलेत त्यांनी ताबडतोब भाजपमध्ये (bjp) जायचं. मग सारं काही माफ होत" असा टोला भुजबळांनी लगावला. "गुलाबराव पाटील (gulabrao patil) मंत्रिमंडळात ओबीसीच्या प्रश्नावर न घाबरता बोलतात. ओबीसी मंत्री खूप आहेत, पण बोलणारे फार कमी आहेत" असे भुजबळ म्हणाले.

"जेलमध्ये असताना माझी प्रकृती फार गंभीर झाली होती. त्यावेळी कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिलेत. त्यांनी माझा जीव वाचवला. काय वागणूक देताय तुम्ही, औषध-पाणी वेळेवर देत नाही असे प्रश्न सरकारला विचारले. पवार साहेबांनी पत्र लिहिलं. भुजबळांच काही वाईट झालं, तर हे सरकार जबाबदार असेल" असं ठणकावून सांगितलं.

Chhagan Bhujbal
ब्लॅकलिस्टेड न्यासा कंपनीवर सरकार मेहरबान? समोर आली धक्कादायक माहिती

"या देशात साडेसात हजार जाती होत्या. या सगळ्यात मोठा ग्रुप ओबीसीचा आहे. सरकार जे देईल तुम्हाला ओबीसी म्हणून देईल. तुम्ही एकत्र आलात तर ताकद दिसेल. ती ताकत उत्तर भारतात दिसली आणि ते सत्तेवर आले. भारत सरकार फोडा आणि राज्य कराने वागतय" असा आरोप भुजबळांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.