Laxman Hake Latest Marathi News
Laxman Hake Latest Marathi News

Lakshman Hake: "...तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतोय की नाही याचा विचार करु"; लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

'ओबीसी आरक्षण बचाव' अशी भूमिका घेऊन वडगोद्री इथं गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली.
Published on

वडगोद्री : 'ओबीसी आरक्षण बचाव' अशी भूमिका घेऊन वडगोद्री इथं गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. यावेळी हाके यांनी त्यांच्यापुढं काही मागण्या ठेवल्या तसेच सरकारकडून लेखी आश्वासन मागितलं आहे. (OBC Reservation Lakshman Hake lets think whether reservation is getting hit or not)

Laxman Hake Latest Marathi News
Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हरयाणा, झारखंड विधानसभेची निवडणूक 'या' तारखेला होणार जाहीर?

हाके म्हणाले, "सरकारनं आम्हाला लेखी लिहून द्यावं पण या लेखीमध्ये हे अपेक्षित आहे की ५४ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली असतील तर त्याची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. म्हणजे एवढ्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातून किती कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली याची अधिकृत सरकारी माहिती जाहीर करावी. यावरुन ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही यावर आम्ही विचार करु. पण नुसतंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं लिहिलेलं पत्र आम्ही स्विकारणार नाही"

Laxman Hake Latest Marathi News
Maratha Reservation: लक्ष्मण हाकेंच्या 54 लाख नोंदी रद्द करण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'खोटं आरक्षण दिलेलं...'

आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर होते. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भूमिका आहे, अशी भूमिका यावेळी गिरीश महाजन यांनी मांडली. आज मुंबईत संध्याकाळी ५ वाजता याबाबत ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकारची बैठक होणार आहे. यासाठी हे शिष्टमंडळ मंबईकडं रवाना झालं आहे.

Laxman Hake Latest Marathi News
Pankaja Munde: '...सरकारने स्पष्ट करावे', लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी केली मागणी

यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणा करत सरकारवर संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. शिष्टमंडळातील नेत्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं लक्ष्मण हाके यांनी ठामपणे सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट द्यावी, एका समाजाला रेड कारपेट आणि आमच्यावर अन्याय का? कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करणे बंद करा, अशी मागणी देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.