ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञातांकडून त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. ( Odisha Health Minister Naba Das Shot admitted to hospital)
ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर नाबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाबा दास यांच्यावर गोळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये तैनात असणारे एएसआय गोपाळ दास यांनी झाडली आहे. गोपाल दास यांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या आहेत. नाबा दास गाडीततून उतरताच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे.
मात्र, पोलिसांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्राथमिक तपास सुरु झाला आहे. आरोपी एएसआय गोपाळ दास फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.