Amruta Fadanvis: अमृता फडणवीसांच्या ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणं भोवलं! पोलिसांनी CA ला ठोकल्या बेड्या

अमृता फडणवीसांच्या ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट केल्याचं प्रकरण भोवलं
amruta fadnavis devendra fadnavis
amruta fadnavis devendra fadnavis Esakal
Updated on

चर्चेत असणाऱ्या व्यक्ति, अभिनेत्री, अभिनेते, राजकीय नेतेमंडळी आणि त्यांचे कुटुंबीय सदस्यांना सोशल मिडियावर नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागताना दिसून येत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील सोशल मिडीयावर अनेकदा केलं जातं. (Latest Marathi News)

अमृता फडणवीस यांना गेल्या काही दिवसांत ट्रोल करण्याचे प्रमाण वाढलं आहे. दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणं छत्रपती संभाजीनगरमधील 'सीए'ला चांगलंच महागात पडलं आहे.

ट्विटवरती अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे लक्षात येताच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी देखील तत्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अतिष ओमप्रकाश काबरा (वय 35, रा. नरहरी वसंत विहार, न्यु एसबीएएच कॉलनी, ज्योतीनगर) असं आरोपीचं नाव आहे.(Latest Marathi News)

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील कमालीची आहे. विविध विषयावर अमृता फडणवीस सोशल मीडियावरून आपलं मत मांडत असतात. अनेकदा त्यांच्या पोस्टची माध्यमांमध्ये दखल घेतली जाते. तर त्यावरही अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. त्यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात येतात.(Latest Marathi News)

amruta fadnavis devendra fadnavis
Supriya Sule: पहाटेचा शपथविधी होणार हे माहित होतं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या,'तेव्हा मी...'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर एका सीए असलेल्या अतिष नावाच्या व्यक्तीने आक्षेपार्ह कमेंट केली होती. हा प्रकार शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. पदाधिकाऱ्यांनी याची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांना कळवण्यात आले.(Latest Marathi News)

सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी आरोपी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध घेतला. तसेच त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. तसेच भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांच्या फिर्यादीवरुन अतिषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

amruta fadnavis devendra fadnavis
Maharashtra Politics : राष्ट्रवादीला परभणीत मोठा धक्का! १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.