Old Pension Scheme : आरोग्य यंत्रणा सलाईनवर! राज्यातील परिचारिका संपावर, रुग्णांचे हाल

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एक दिवसाचा संप पुकारला आहे. परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
Old Pension Scheme
Old Pension Schemeesakal
Updated on

छत्रपती संभाजी नगरः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एक दिवसाचा संप पुकारला आहे. शासनाच्या इतर विभागांमुळे सामान्यांना त्रास सोसावे लागेल. परंतु परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी आज (गुरुवार) जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एक दिवसाचा संप पुकारला आहे. सरकारने समिती नेमून सात ते आठ महिने झाले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. २००५ नंतर रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहे.

Old Pension Scheme
Parliament Security Breach: संसदेतील घुसखोरीच्या घटनेनंतर सुरक्षेबाबत UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष करणार तपास

गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने परिचारिका दाखल झाल्या होत्या. रुग्णालयातील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सलाईनवर गेल्याचं चित्र दिसून येतंय.

Old Pension Scheme
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये?

दरम्यान, राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी आहे. त्यामुळे आजच्या बंदचे पडसाद सभागृहात उमटतात का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. राज्यातील इतर रुग्णालयांमध्येही परिचारिका संपावर गेल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()