नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या (Corona Count Increase In Delhi ) पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कोरोनाचा (Corona Pandemic) संसर्ग रोखण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन म्हणजेच यलो अलर्टच्या लेव्हल-1 ते निर्बंध लागू करण्यात केला आहे. जेव्हा कोविड संसर्ग दर सलग दोन दिवस 0.5 टक्क्यांपेक्षा जास्त राहतो त्यावेळी अशा प्रकारचे निर्बंध लागू केले जातात. (Level-1 of Graded Response Action Plan i.e. Yellow Alert In Delhi)
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये कोरोना संसर्ग होण्याचा रेट 0.5 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन म्हणजेच यलो अलर्टच्या लेव्हल-1 ते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातदेखील ओमिक्रॉनच्या ( Omicron Count In India) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून राज्यातदेखील यलो अलर्ट जारी केला जाऊ शकतो का? आणि तो लागल्यास काय निर्बंध लागू केले जाऊ शकतात ते आपण पाहूया. (Higher Number Of Omicron cases In Maharashtra )
यलो अलर्टमध्ये काय असतात निर्बंध
एखाद्या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर यामध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करणे, शाळा आणि महाविद्यालये बंद करणे, सम-विषम तत्त्वावर अनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणे, मेट्रो ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक बसमधील प्रवाशांची आसन क्षमता निम्मी करणे यासारख्या उपाय योजनांचा समावेश असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.