Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकरांना दिलासा, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार नाही; नेमकं प्रकरण काय?

Dharashiv Breaking News: ओमराजेंवर गुन्हा दाखल होणार नसून ओमराजे हे स्वतः उमेदवार असल्याने त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जातो त्यामुळेच गुन्हा दाखल होण्यापासून त्यांना दिलासा मिळाला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आलेली आहे.आमदार कैलास पाटील यांच्यासह ओमराजे यांचे २ व कैलास पाटील यांचा १ अशा ४ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkarsakal
Updated on

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार देण्यात आलेली होती. परंतु त्या प्रकरणात ओमराजेंना दिलासा मिळाल असून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार नाही.

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या अंगरक्षक, अशा चार जणांवर गुन्हा दाखल करा आणि एफआयआर प्रत जिल्हा निवडणूक आयोगाकडे द्या, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते.

या प्रकरणात ओमराजेंवर गुन्हा दाखल होणार नसून ओमराजे हे स्वतः उमेदवार असल्याने त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जातो त्यामुळेच गुन्हा दाखल होण्यापासून त्यांना दिलासा मिळाला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आलेली आहे.आमदार कैलास पाटील यांच्यासह ओमराजे यांचे २ व कैलास पाटील यांचा १ अशा ४ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Omraje Nimbalkar
Todays Rain Updates : राज्यात आज कसा असेल पाऊस? मुंबईत रेड अलर्ट! पुण्यात नेमकी काय स्थिती?

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी तसे आदेश दिले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आलेली होती.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची तक्रार

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे आपल्या अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रावर फिरत होते. त्यामुळे मतमोजणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दबाव निर्माण झाल्याचा आरोप केला होता.

Omraje Nimbalkar
Video | खापरखेडा फाटकावर धक्कादायक घटना: स्कूलबस रेल्वे रुळावर अडकली.. अन् समोरून भरधाव रेल्वे आली

सिसीटीव्ही फुटेज तपासणी

तक्रारीवरून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आचारसंहिता भंग झाला की नाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ओमराजे हे उमेदवार असले तरी ते अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रात जावू शकत नाहीत, असे तक्रारीत नमूद केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com