दिशा सलियन प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होणार; चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख

'दिशा सालियना प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषेचा वापर सुरु'
chandrakant patil
chandrakant patilsakal media
Updated on
Summary

'दिशा सालियना प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषेचा वापर सुरु'

सात मार्चनंतर दिशा सलियन या प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार आहेत, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते. दिशा सालियना प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषेचा वापर सुरु आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

chandrakant patil
असं कोणतं आभाळ कोसळणार आहे? वानखेडेंच्या याचिकेवर HC चा संतप्त सवाल

यावेळी ते म्हणाले, या प्रकरणात दुध का दुध और पाणी का पाणी, लवकरचं होणार आहे. सात मार्चला सगळे पुरावे समोर येतील. आणि यात सहभागी असणार सर्वजण तुरुंगात जाणार असल्याते त्यांनी स्पष्ट केलं आहे. उसन आवसान आणणं, शिवराळ भाषा वापरण हे सगळ आता बाहेर येणार आहे. दिवा विझण्यापूर्वीची ही फडफड आहे, या प्रकरणात नेमक काय झाले हे बंदिस्त आहे. ते सात मार्चनंतर उघडेल तेव्हा कळेल नेमंक कोण आहे ते, असेही ते म्हणाले आहेत.

यावेळी ते म्हणाले, मंत्रिमंडळात ज्याच्यावर आरोप नाहीत असा मंत्री शोधावा लागेल. पोलिस प्रशासन दबावाखाली काम करीत आहे. कायद्याचा दुरुपयोग किती करावा याची मर्यादा नाही. नितीन राऊत यांचा मुलगा गुंडांबरोबर असतो. त्यामुळे त्यानी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. पाच वर्षं ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या मागे फिरत होता. मागे लागून सत्तेत आला कालचक्र असत त्याला अपवाद फार कमी लोक ठरतात, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कालचक्र त्यांच्या बाजूने आहे ते खाली येईल, असेही ते म्हणाले आहेत. एसटी संपासंदर्भात ते म्हणाले, एसटी महामंडळ बंद करुन अजागा घशात घालण्याचा डाव आहे. त्यात या कर्मचाऱ्यांच्या संपाची वाट लागली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

chandrakant patil
Hijab Row : याचिकाकर्त्या मुलीच्या कुटुंबीयांवर हल्ला? भाऊ गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()