23 September In History: ख्यातनाम मराठी चित्रपट आणि जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन, वाचा आजच्या दिवशी काय घडले

23 September in History: आजच्या दिवशी कोणत्या खास घडामोडी घडल्या हे एका क्लिकवर जाणून घेऊया.
23 September In History:
23 September In History:Sakal
Updated on

23 September in History:  ख्यातनाम मराठी चित्रपट आणि जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन झाले होते. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तसेच आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

1873 - महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

1884 - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी "बॉंबे मिल हॅंड्‌स असोसिएशन' नावाने गिरणी कामगारांची संघटना स्थापना केली. भारतातील संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय.

1908 - हिंदीतील कवी व लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रामधारी सिंह "दिनकर' यांचा जन्म. भागलपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे ते हिंदी भाषाविषयक सल्लागार होते. "संस्कृती के चार अध्याय' या बृहद्‌ग्रंथात भारतीय संस्कृतीचा त्यांनी विचारप्रवर्तक आढावा घेतला आहे. "रेणुका', "हुंकार', "रश्‍मिरथी', "नीलकुसुम' हे त्यांचे काही काव्यग्रंथ. त्यांचे "उर्वशी' महाकाव्य हिंदीमध्ये विवाद्य ठरले.

1911 - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचा जन्म. त्यांचे प्रमुख संशोधन प्रकाशाचे विखुरणे, वर्णपट विज्ञान, स्फटिकभौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी एका नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिकरीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. या परिणामाला "कृष्णन परिणाम' असे नाव प्राप्त झाले आहे.

1919 - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. त्यांची "अ पायलट सर्व्हे ऑफ शिरुर तालुका - ऍग्रो इंडस्ट्रिअल बॅलन्स', "क्‍लाइंबिंग अ वॉल ऑफ ग्लास', "सरदार सरोवर डिबेट', "ओ नर्मदा' इ. अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

1920 - नाट्यकला, विज्ञान, अध्यात्म या सर्व क्षेत्रंत सारख्याच अधिकाराने वावरणारे सव्यसाची व्यक्तिमत्त्व, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, हौशी प्रायोगिक रंगभूमीचे अध्वर्यू, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रा. भालबा केळकर (भालचंद्र वामन केळकर) यांचा जन्म.

23 September In History:
22 September in History: नाटककार-दिग्दर्शक पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे निधन

1950 - गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य करणारे डॉ. अभय बंग यांचा जन्म. त्यांना "महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारतीय संसद सदस्य संघटनेतर्फे "सत्पाल मित्तल स्मृती पुरस्कार' डॉ. बंग यांच्या "सर्च' या संस्थेला मिळाला. "सर्च' या स्वयंसेवी संस्थेने नवजात मुलांचे आरोग्य या विषयावर आजपर्यंत जे सखोल संशोधन आणि प्रयोग केले आहेत त्याचा सन्मान जागतिक पातळीवर विशेषांक काढून करण्यात आला. "नेचर' या जगप्रसिद्ध प्रकाशनाने "निओनेट्‌स इन गडचिरोली' या नावाने विशेषांक काढून "ग्लोबल हेल्थ कौन्सिल'च्या जागतिक संमेलनात उपलब्ध करून दिला.

1964 - नाटककार, कादंबरीकार भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर यांचे निधन. सत्तेचे गुलाम, करीन ती पूर्व, हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार आदी नाटके त्यांनी लिहिली. रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र चट्टोपाध्याय, जेम्स बॅरी, हेन्रिक इब्सेन, विल्यम बॅरेट यांच्या साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केले. विधवाकुमारी, संसार की संन्यास, धावता धोटा या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांना सरकारने "पद्मविभूषण' सन्मान प्रदान केला होता.

1992 - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस इंद्रजित गुप्ता "उत्कृष्ट संसदपटू'साठीचा "गोविंद वल्लभ पंत पुरस्कार' पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते प्रदान.

1999 - ख्यातनाम मराठी चित्रपट आणि जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.

2003 - भारतीय वंशाच्या मीरा नायर यांची आशिया अमेरिकी साहित्य पुरस्कारासाठी निवड. त्यांच्या "व्हीडिओ ः स्टोरीज' या पुस्तकात स्थलांतराबाबतच्या अनुभवांचे कथन करण्यात आले आहे.

2004 - योकोहामा (जपान) येथील मैदानी स्पर्धेत भारताच्या अंजू जॉर्जने रशियाची ऑलिंपिक विजेती तात्याना लेबेदेवाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

2004 - कर्करोगावरील उपचाराचा प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ नये, यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी शरीरातून अंडाशयाच्या उती (ओव्हेरियन टिश्‍यू) काढलेल्या महिलेने त्यांच्या पुनर्रोपणानंतर बाळास जन्म दिल्याची घटना पॅरिस येथे घडली. या प्रकारच्या पुनर्रोपणानंतर महिलेने मातृत्व प्राप्त केल्याची ही पहिलीच घटना असून, ही पद्धत यशस्वी ठरल्यास त्याचा उपयोग कर्करोग अथवा तत्सम इतर रोगांवर उपचार घेणाऱ्या स्त्री, पुरुषांना होऊ शकेल, असे "कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ ल्यूव्हिन'चे प्रा. जॅक्‍स डॉनेझ यांनी म्हटले.

2009: भारतीय अवकाश कार्यक्रमाला यशाचीच नवनवी शिखरे दाखविणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाने (पीएसएलव्ही) सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या ‘लॉँच पॅड’वरून सलग पंधरावे उड्डाण यशस्वी करत ‘ओशनसॅट २’सह सहा ‘नॅनोसॅटेलाइट’ला ध्रुवीय सूर्यस्थिर कक्षेत नेऊन ठेवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.